Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव, केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी

4

Kalyan Vertex Building Fire News : कल्याणमध्ये गगनचुंबी व्हर्टेक्स या इमारतीला भीषण आग लागली. इमारतीतील १५व्या मजल्यावर ही आग लागली. मात्र या आगीमुळे १६ आणि १७ मजल्यावरील घरांचं मोठं नुकसान झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रदीप भणगे, कल्याण : कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स या नामकिंत गगनचुंबी हाय फोफ्राईल सोसयटीतील १५व्या मजल्यावर आग लागली. संतोष शेट्टी यांच्या घराला आग लागल्याची घटना मंगळवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. अचनाक आग लागल्यानंतर या आगीने मोठा पेट घेतला आणि धुराचे लोट उठले. लांब पर्यंत या धुराचे लोट दिसत होते. महत्त्वाची बाब म्हणजे वेळेत आगीवर नियंत्रण न मिळाल्याने १५व्या मजल्यावरील आगीचे लोट हवेमुळे डॉ. सुमित श्रीवास्तव यांच्या १६व्या आणि १७व्या मजल्या वरील डॉ. नितीन झबक यांच्या घरापर्यंत पोहचले, यामुळे या आगीत तीन मजल्यावरील सदनिका जळून खाक झाल्या आहेत.
मुंबईकरांची चिंता वाढली! वायू प्रदूषण धोकादायक स्तरावर; या भागात सर्वात खराब हवा, तज्ज्ञांनी कारणही सांगितलं
उंच इमारतीमधील आग विझवण्यासाठी केडीएमसीकडून ५५ मीटर लांबीची शिडी असलेली अद्यावत गाडी घेण्यात आली होती, मात्र ही गाडी बंद असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागला मोठी कसरत करावी लागली. तर अग्निशमन दलाच्या गाड्या उशिराने आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. यामुळे केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचे दिसून आले.
Kalyan News : ४२ दिवसांच्या बाळासोबत भयंकर कृत्य, पण पोलिसांमुळे थोडक्यात टळला अनर्थ; कल्याणमधील धक्कादायक घटना
कल्याण – डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळी पोहचत परिस्थितीची माहिती घेतली. तसंच ५५ मीटर शिडी असलेली अग्निशमन गाडी तांत्रिक बिघाडामुळे कार्यान्वित नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे ठाणे मनपाकडून गँल्डर अग्निशमन गाडी पाचरण करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. इमारतीतील रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढलं असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याआगीच्या घटनास्थळी मनपा आधिकारी कर्मचारी असा मोठा फौजफाटा उपस्थित होता.
नरिमन पॉईंट ते विरार दीड तासांचा प्रवास ३५ मिनिटांत होणार, कसा असेल मार्ग? कधी सुरू होणार?

Kalyan News : कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव, केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल ३ तासानंतर आग विझवण्यात यश आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग ऑपरेशन सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यानिमित्ताने कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील इमारतीमधील फायर फायटिंग यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने आता डोळस भूमिका घेत अति जुन्या उंच इमारतीमधील फायर फायटिंग यंत्रणा अपडेट कशी होईल याबाबत अमंलबजावणी केली पाहिजे अशी चर्चा होताना दिसते आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.