Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

योगेश कदमांचा एकहाती विजय, रामदास कदमांच्या होमपिचवर मनसेच्या शिलेदाराचे डिपॉझिट जप्त

5

Ratnagiri Dapoli Vidhan Sabha MNS Candidate Deposit Seized : रत्नागिरीत विधानसभेत योगेश कदम यांचा विजय झाल्यानंतर दापोलीत मनसे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं आहे. मनसेच्या उमेदवारासह इतर ७ जणांचंही डिपॉझिट जप्त झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रसाद रानडे, रत्नागिरी : मनसेमुळे मुंबईतील काही मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय झाला, तर गुहागरमध्ये ही मनसेच्या मतांमुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचा विजय हा सोपा झाला. मात्र दापोली मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्यात शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या होमग्राउंडवर महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम यांना मोठ यश आलं आहे. त्यामुळे मनसेच्या मतांचा प्रभाव हा कोकणातील दापोली, खेड, मंडणगड या मतदारसंघात निष्क्रिय करून त्यांचे डिपॉझिटच जप्त करत महायुतीने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. इतकच नाही तर मनसेसहित सात उमेदवारांच डिपॉझिट जप्त झालं आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांच्यासमोर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार संजय कदम यांचे मोठ आव्हान होत. इतकंच नाहीतर निवडणूक झाली त्याच दिवशी संध्याकाळी संजय कदम यांनी खेडमध्ये विजयाची रॅली काढून आपला विजय झाल्याचा रिपोर्ट पोलिसांना पाठवला आहे, असं सांगत मोठा धमाका उडवला होता. अशातच आमदार योगेश कदम यांच्या मुंबईतून येणाऱ्या मतदारांच्या काही गाड्याही मतदानाच्या आदल्या दिवशी येऊ शकलेल्या नव्हत्या, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. दापोली मतदारसंघ हा अचानक चर्चेत आला होता. योगेश कदम यांच्या विजयाबद्दल अनेकांकडून उलट सुलट चर्चा सुरू होत्या.
Kalyan News : कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव, केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी
महायुतीमधील भाजपा व राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा सुद्धा थेट आशीर्वाद योगेश कदम यांना असल्याने तेही शांत होते, महायुतीचे नेते वाद मिटल्यावर सक्रियपणे प्रचारात होते. तर याच मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रचाराची यंत्रणाही महायुतीसाठी सायलेंट मोडवर काम करत होती. संघाच्या प्रचार यंत्रणेचा या विजयात सक्रिय सहभाग होता. दरम्यान याच वेळी दाभोळ गटातील भाजपच्या जिल्हास्तरीय महिला पदाधिकारी यांनी मात्र उघडपणे महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या विरोधात भूमिका घेत काम केल्याने हे टेन्शन अधिकच वाढलं होतं. अशातच दोन नेत्यांनी मतदानाच्या आधी लक्ष्मी दर्शन घेत ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना मदत केल्याची ही चर्चा रंगली होती.
मुंबईकरांची चिंता वाढली! वायू प्रदूषण धोकादायक स्तरावर; या भागात सर्वात खराब हवा, तज्ज्ञांनी कारणही सांगितलं
मात्र मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावरची मतमोजणी सुरू झाली त्यानंतर पहिल्या फेरीपासूनच अगदी पोस्टल मतमोजणीच्या फेरीपर्यंत आमदार योगेश कदम यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली होती. मात्र एक दोन फेरीमध्ये ही आघाडी २०० ते ४०० मतांनी मागे आली, मात्र योगेश कदम यांची आघाडीची घौडदौड कायम होती. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार योगेश कदम यांचा तब्बल २४ हजार ७९८ मतांनी दणदणीत विजय झाला. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार संजय कदम हे वगळता अन्य सात उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. याचवेळी महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांना दापोली शहरात विजय आघाडी असली तरीही मात्र काही केंद्रावरती फारच कमी मत मिळाल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसत होतं.

दापोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी आज निवडणूक विभागाच्या निकषानुसार सात उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, अशी माहिती दिली आहे.
Uddhav Thackeray : निकाल अनाकलनीय, महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल वाटलं नव्हतं, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Ratnagiri News : योगेश कदमांचा एकहाती विजय, रामदास कदमांच्या होमपिचवर मनसेच्या शिलेदाराचे डिपॉझिट जप्त

२६३ दापोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी पार पडली. त्यानुषंगाने उपोद्घातातील अ.क्र. १ अन्वये ज्या मतदारसंघामध्ये मतदान झाले आहे, अशा मतदार संघातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास मिळालेली वैध मते ही सदर निवडणूकीमधील एकूण वैध मतांच्या एक एकषष्टांशपेक्षा कमी असल्यास अशा उमेदवाराची अनामत रक्कम जप्त केली जाईल अशी तरतूद आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.