Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Amit Thackeray: माहिम विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर मनसेचे नेते अमित ठाकरे पुन्हा सक्रीय झाले आहे. सायन कोळीवाड्यातील घटनेवरून त्यांनी थेट इशारा दिला आहे.
‘हे’ फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे! सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. अशी पोस्ट अमित ठाकरे यांनी एक्सवर शेअर केली आहे.
या पोस्टखाली अमित ठाकरे यांनी एक थ्रेडच्या माध्यमातून सायन कोळीवाडा येथे मुलीवर झालेल्या अत्याचार आणि अंमली पदार्थ विक्रीवरून इशारा दिला आहे. पाहा काय म्हटले आहे अमित ठाकरे यांनी…
अमित ठाकरे यांची पोस्ट
आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत.महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर; एखादा पक्ष, व्यक्ती ठरवणार का? सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी
कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात ५ टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतं कुठून? ते पोहोचतं कुठे? आणि याचे सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ड्रग्सचं नेटवर्क मोडून काढणं आता आवश्यक झालं आहे. मनसेनं सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे.
सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे.आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे. जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही!
सर्वांचे लक्ष महाराष्ट्रावर तिकडे बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या पक्षाने केला मोठा गेम; NDAसह इंडिया आघाडीचे धाबे दणाणले
हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसं उत्तर देण्याची!
– आपला,अमित ठाकरे