Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांना मदत केल्याप्रकरणी पक्षाने जिल्हा उपाध्यक्षंसह चार जणांना सहा वर्षासाठी निलंबित केले आहे.

अलिबाग विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात दिलीप भोईर यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दिलीप भोईर यांना अर्ज दाखल केल्यापासून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच अर्ज मागे घेण्याच्या पूर्व संध्येपासून दिलीप भोईर यांनी भाजपचे वरिष्ठ नेते सहित मंत्री महोदय यांच्याशी संपर्क तोडला होता. शेवटपर्यंत त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे त्यांनी युती धर्म पाळला नाही व पक्ष विरोधी काम केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची धैर्यशील पाटील यांनी सांगितले. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर; एखादा पक्ष, व्यक्ती ठरवणार का? सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी
बंडखोर दिलीप भोईर यांना जिल्हा उपाध्यक्ष जयंवत अंबाजी यांच्यासहित सर्वश्री जिल्हा चिटणीस महेंद्र चौलकर,परशुराम म्हात्रे,ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर राणे यांनी सहित अनेक पदाधिकारी यांनी साथ दिली होती. भोईर यांनी जवळपास 33 हजार मते घेतली. त्याचा परिणाम महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या मताधिक्यमध्ये घट झाली. सर्वांचे लक्ष महाराष्ट्रावर तिकडे बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या पक्षाने केला मोठा गेम; NDAसह इंडिया आघाडीचे धाबे दणाणले
दिलीप भोईर हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र महायुती मधील जागा वाटपामध्ये अलिबाग मतदार संघाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना आल्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर हे नाराज होते. त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भोईर हे पूर्वी शेकापक्षात होते. दोन वर्षापूर्वी ते भाजपमध्ये आले. अलिबाग मुरुड मतदार संघातील काम पाहून भाजपने त्यांना जिल्हा उपाध्यक्ष तसेच अलिबागच्या भाजपच्या वॉर रूमची जबाबदारी भोईर दिली होती. मतदार संघात भोईर यांनी भाजपची ताकद वाढविली होती.अलिबागचा पुढील आमदार भाजपचा असेल असे वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबाग येथे केले होते. त्यामुळे भोईर हे भाजपा उमेदवारी देईल म्हणून आशावादी होते. मात्र महायुती जागा वाटपामध्ये अलिबागची उमेदवारी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना दिल्याने ते नाराज होते.
भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष दिलीप भोईर यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. महायुतीच्या धोरणानुसार अधिकृत उमेदवार असतानाही उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांना वरिष्ठ नेत्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दिलीप भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून पक्षाच्या धोरणाविरोधात कारवाई केल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यासमवेत असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील याबाबतची समाज देण्यात आली होती. तसेच पक्षातील इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत राहून काम केल्यास पक्षाला कटू निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई कारवाई लागेल, असे स्पष्ट ताकीद खासदार धैर्यशील पाटील यांनी दिली होती.