Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अमित ठाकरेंना पाडणाऱ्या शिलेदाराला उद्धव यांचं खास गिफ्ट, तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप झालेल्या हॉटेलमधून धक्कादायक प्रकार समोर

5

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Nov 2024, 9:09 am

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याचा ‘सस्पेन्स’ कायम असताना नाशिकच्या महायुतीतील घटकपक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून चढाओढ सुरू झाली आहे. महायुतीत नाशिकचे पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाकडे असल्यामुळे ‘आमचाच पालकमंत्री होईल,’ असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. तर, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरात भाजपच्या आमदारांची संख्या अधिक असल्यामुळे भाजपकडे पालकमंत्रिपद असावे, अशी मागणी भाजप महानगरप्रमुख प्रशांत जाधव यांनी केली. बातमी वाचा सविस्तर…
२. ‘राजकीय पक्ष देशापेक्षा धर्म मोठा करत असतील, तर आपली स्वतंत्रता पुन्हा धोक्यात येईल,’ असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी नमूद करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण स्पष्ट केले. संविधान स्वीकारून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवारी जुन्या संसद भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रणनीती म्हणून अशांतता पसरवणे लोकशाही संस्थांसाठी धोकायदायक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

३. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलफेऱ्यांना असलेला प्रतिसाद लक्षात घेता आज, बुधवारपासून नव्या १३ लोकलफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या फेऱ्या अंधेरी, वांद्रे आणि भाईंदर स्थानकातून धावणार आहेत. या स्थानकातून गर्दीमुळे एसी लोकलमध्ये प्रवेश करू न शकणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

४. जुन्या वादातून तिघांनी मिळून एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला केला. हा प्रकार कोथरूड परिसरात घडला. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात, कानाजवळ आणि दोन्ही तळहातांवर हत्याराने वार केले आहेत. तरुणावर गंभीर स्वरूपाचा हल्ला झाल्यानंतरही कोथरूड पोलिसांनी आरोपींवर केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. बातमी वाचा सविस्तर…

५. शेजाऱ्याने साडेतीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करून त्याची ६० हजारांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोन दिवसांत शोध घेऊन तीन आरोपींना अटक केली आहे.

६. सिग्नल सुरु करायला पाच मिनिट उशीर झाल्याने पोलिस अधीक्षकांनी दोन महिला वाहतूक पोलिसांची तडकाफडकी बदली केल्याचा प्रकार समोर आला आहे. उशीर होण्याचे कारण न विचारताच पोलीस अधिक्षकांनी कार्यवाही केल्याने खळबळ माजली आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उचलला जाणार काय? याकडे लक्ष लागलं आहे. बातमी वाचा सविस्तर…

७. विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी विरारामधील झालेला राडा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी पैसे वाटल्याचे आरोप केले. विरारमधील विवांता हॉटेलमध्ये सर्व प्रकार घडला होता. चार तास सुरु असलेल्या या गोंधळाची राज्यभर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी येणार असल्याची टीप मला भाजमधील एका नेत्यानेच दिल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले होते. अखेर क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी तावडे यांना स्वत:च्या गाडीमध्ये घेत बाहेर काढलं होतं. या प्रकरणानंतर आता धक्कादायक माहिती समो आली आहे.

८. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मोहम्मद सिराज यांचे सात वर्षांचे हे नाते आता तुटलेले दिसत आहे. आयपीएल २०२५साठी आयोजित लिलावात बेंगळुरु संघाने त्याला खरेदी केले नाही आणि तो गुजरात टायटन्सचा भाग बनला. गुजरात टायटन्सने त्याला १२.२५कोटी रुपयांमध्ये आपल्या संघाचा भाग बनवले आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराज २०२५मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये लाल जर्सी घालून खेळताना दिसणार नाही. आरसीबीने मोहम्मद सिराजसाठी आरटीएम कार्ड वापरले नाही. आता आरसीबीमधून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया समोर आली आहे. जिथे त्याने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्याने एक लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे.

९. महिलांसाठी स्वतःचे घरच मृत्यूचा सापळा ठरत असल्याची धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्रांच्या दोन संस्थांनी नोंदवलेल्या निरीक्षणातून मंगळवारी निरीक्षणातून समोर आली. या संस्थांच्या अहवालानुसार, मागील वर्षी २०२३ मध्ये दररोज १४० मुली व महिलांची त्यांचा जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हत्या करण्यात आली. सोमवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिनानिमित्त याबाबतचा अहवाल प्रकाशित करण्यात आला.

१०. भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात शुक्रवार आणि नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, मोठ्या तेजीचे वादळ आले होते. शुक्रवार आणि सोमवार या दोन सत्रांमध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने मोठी उसळी घेतली पण, ज्याची भीती होती तेच मंगळवारी घडले. दिवसभराच्या चढ-उतारात सेन्सेक्स १०५.७९ अंकांनी घसरून ८०,००४.०६ वर क्लोज झाला तर निफ्टीही २७.४० अंक घसरणीसह २४,१९४.५० वर स्थिरावला. अशाप्रकारे बाजारात आलेला तात्पुरता आनंद मावळला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.