Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Plants for Growth and Prosperity: घरात सुख-समृद्धी नांदावी तसचे पैशांची कमतरता कधी ही होवू नये म्हणून वास्तूशास्त्रानुसार मनी प्लांट, तुळस किंवा शमी अशी झाडं लावली जातता पण तुम्हाला माहित आहे यापेक्षाही एक झाडं खूप प्रभावी आहे. जे घरातील आर्थिक स्थिती उत्तम ठेवतं तसेच घरातील वातावरण कायम सकारात्मक राहतं. ते झाडं कोणतं ते कोणत्या दिशेला लावावं याबद्दल जाणून घेवूया या लेखात
या झाडाबद्दल ऐकलं आहे का?
धनवृद्धीसाठी मनी प्लांट, तुळस किंवा शमी ही झाडे लावली जातात पण तुम्ही कधी क्रॅसुला या रोपाबद्दल ऐकलं आहे का? वास्तुशास्त्रानुसार, धन लाभासाठी क्रॅसुला झाड नेहमी आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या पूर्व किंवा उत्तर दिशेत लावावे. हे झाड हवा शुद्ध करते तसेच कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. जर तुम्ही हे झाड घर आणि ऑफिसमध्ये योग्य दिशेला ठेवलं तर वास्तुदोष दूर होतो तसेच घरातील धनसंपत्ती वाढते.
मुख्य दारापासून दूर ठेवा क्रॅसुला
क्रॅसुला झाड मुख्य दारापासून दूर ठेवावे, कारण मुख्य दाराला ऊर्जा आणि चक्रांची जागा मानले जाते. क्रॅसुला झाडं तुम्ही लिव्हिंग रूममध्ये लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार क्रॅसुलाचे रोपं मुख्य दारात ठेवल्याने धनसंपत्तीच्या मार्गात अडचणी येवू शकतात. म्हणून क्रॅसुलाचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे घराच्या ऊर्जा प्रवाहात अडथळा येणार नाही.
ऑफिसमध्ये क्रॅसुला कुठे ठेवायचे?
ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक राहण्यासाठी तसेच प्रमोशन, पगार वाढ यासाठी क्रॅसुला तुमच्या डेस्कच्या दक्षिण-पश्चिम दिशेत ठेवू शकता. यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर कॅश काउंटरवर हे क्रॅसुलाचे रोप ठेवणे शुभ ठरू शकते.
बेडरूममध्ये क्रॅसुला ठेऊ नका
बेडरूम किंवा स्वयंपाक घर येथे क्रॅसुलाचे रोप ठेऊ नये. बेडरूम ही आराम करण्याची जागा आहे, म्हणून शक्यतो बेडरूममध्ये कोणतेही झाड ठेवण्याची शिफारस केली जात नाही.
क्रॅसुलाची पाने नेहमी स्वच्छ ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरात क्रॅसुलाचे रोप ठेवत असाल तर हे लक्षात ठेवायला हवे की त्याच्या पानांची स्वच्छता करा. क्रॅसुलाच्या पानांना धुळ लागणार नाही हे कटाक्षाने पहायला हवे. असे केल्यामुळे तुम्ही जिथे क्रॅसुलाचे रोप ठेवले आहे तिथे सकारात्मक ऊर्जा राहते.
सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी ठेवा क्रॅसुला
असे मानले जाते जर क्रॅसुलाचे रोप अंधारात ठेवले तर ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. म्हणून क्रॅसुला अशा ठिकाणी ठेवावे जिथे चांगला सूर्यप्रकाश येतो. जर क्रॅसुला घराच्या बाल्कनीत किंवा छतावर ठेवले तर ते सुखसमृद्धी अबाधीत राहते असे म्हणतात. तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करून क्रॅसुलाचे रोप लावले तर धनसंपत्तीचे मार्ग खुले होतील तसेच तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहते.