Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…
Devendra Fadnavis On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं. सत्ता स्थापनेसाठी भाजपचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल, भाजपच्या नेतृत्त्वानं घेतलेला निर्णय मला आणि शिवसेनेला मान्य असेल, असं सांगत त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. त्यांच्या या विधानानंतर फडणवीसांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.


बुधवारी फडणवीस नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. जिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांवर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महायुतीमध्ये आम्ही सर्व एक आहोत. एकनाथ शिंदे, मी किंवा अजित पवार असोत. आमच्या युतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. निवडणुकीपूर्वीही आम्ही सर्व निर्णय एकत्र घेऊ, असे सांगितले होते. आमच्याकडे ज्येष्ठ नेते आहेत आणि तेही आमच्यासोबत बसून निर्णय घेतील. त्यानुसार सर्व निर्णय घेतले जातील’, असेही फडणवीस म्हणाले.

तसेच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करून देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘असे असूनही कोणाच्याही मनात जर काही किंतू परंतु असेल तर आज एकनाथ शिंदे यांनी तो देखील दूर केला’ असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीवर त्यांना मुख्यमंत्रीपदी पाहायचे असल्याच्या प्रश्नावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…
दरम्यान, एकनात शिंदे यांच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत केलं गेलं असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील शिंदे यांचं कौतुक केलं आहे. शिंदे यांनी अडीच वर्षांच्या काळात महायुती मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे. युतीचा नेता कसा काम करतो याचं उदाहरण हे शिंदे असल्याचं म्हणत बावनकुळे यांनी ते राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री असल्याचं सिद्ध झालं आहे, असंही सांगितलं आहे.