Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pune ATM Robbery CCTV Footage : मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममधून अवघ्या १ मिनिट २८ सेकंदात १० लाख ८९ हजार ७०० रुपयांची चोरी झाली. दोन चोरट्यांनी चावीच्या साहाय्याने एटीएम उघडून रोख रक्कम लंपास केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पौड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे चोरट्यानी कोणतेही एटीएम न फोडता चावीचा वापर करून ही चोरी केली आहे. या प्रकरणी प्रवीण चिमणदास बुटाला यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावाच्या हद्दीत असलेल्या पुणे जिल्हा मध्यावर्ती बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये दोन व्यक्ती पैसे काढण्यासाठी आल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
काही वेळात आजूबाजूचा कानोसा घेत त्यातील एका व्यक्तीने चावीच्या सहायाने एटीएमचा दरवाजा उघडला. त्यानंतर त्याने एटीएमच्या आतमध्ये ठेवलेल्या लॉकचा पासवार्ड टाकून रोख रक्कम 10 लाख 89 हजार 700 रू ट्रे सह स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी ती रक्कम बॅगेत भरून चोरी करून चोरून नेले. या प्रकरणी पौड पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश जाधव करत आहेत.
दरम्यान, चोरांनी नेमकी काय युक्ती केली याची तपास पोलीस करत आहेत. कारण त्यांनी काहीही न करता थेट मशीनमधील पैसे काढले आणि बॅगमध्ये भरत तिथून फरार झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.