Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

EVM हॅक करुन १५ ते २५ टक्के मतदान ‘सेट’, इस्राईलमधील तंत्रज्ञानाचा वापर, प्रशांत जगतापांचा आरोप

6

Prashant Jagtap : निवडणुकीत ‘ईव्हीएम’ हॅक करून १५ ते २५ टक्के मतदान ‘सेट’ केले असून, त्यासाठी इस्राईलमधील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा आरोप हडपसर विधानसभा मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला.

महाराष्ट्र टाइम्स
prashant jagtap

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महायुतीने विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ हॅक करून १५ ते २५ टक्के मतदान ‘सेट’ केले असून, त्यासाठी इस्राईलमधील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा आरोप हडपसर विधानसभा मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला. ‘व्हीव्हीपॅट’ची मोजणी, जन आंदोलनाबरोबर कायद्याच्या चौकटीत दाद मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जगताप म्हणाले.

‘ईव्हीएम’ बाबत असणार तक्रारींसंदर्भात पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची राष्ट्रवादी भवन येथे बैठक आयोजिण्यात आली होती. या वेळी विधिज्ञ असीम सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, महाविकास आघाडीचे सचिन दोडके, रमेश बागवे, दत्ता बहिरट, अशोक पवार आदी उपस्थित होते. या वेळी जगताप यांनी पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’वर फोडून या प्रकरणी याचिका, व्हीव्हीपॅटची मोजणी आणि जनआंदोलन अशा तीन स्तरांवर आंदोलन उभे करणार असल्याचे सांगितले. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील एक ‘ऑडिओ क्लिप’ आपल्या हाती लागली असून, त्यात ‘ईव्हीएम हॅक’ करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.
शाळेत जाताना डंपरची स्कूटरला जबर धडक; अपघातात मायलेकाचा मृत्यू, मुंबईतील दुर्दैवी घटना
इस्राईल देशातील काही व्यक्ती आपल्या संपर्कात असून, पुराव्यांची जुळवाजुळव करण्यात येत असल्याचे जगताप म्हणाले. भाजपच्या एका नेत्याचा यात सहभाग असल्याचा आरोपही जगताप यांनी या वेळी केला. ‘व्हीव्हीपॅट’ची मोजणी प्रशांत जगताप यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांनी मतमोजणीदरम्यान आक्षेप घेतला, तेव्हा पाच मतदान केंद्रावरील ‘व्हीव्हीपॅट’ मधील चिठ्यांची मोजणी केली होती. तेव्हा झालेले मतदान आणि चिठ्ठयांची मोजणी जुळली होती. मात्र, कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील सर्व ‘व्हीव्हीपॅट’ मधील चिठ्ठयांची मोजणी करण्याचा निर्णय घेतल्याचे जगताप म्हणाले. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे पैसे भरून ही मोजणी करणार असल्याचे जगताप म्हणाले.
बंडखोरांची घरवापसी नकोच! भाजप निष्ठावंतांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा; पक्षाकडे अहवाल
मतदानाच्या दिवसाचाच घोळ
प्रत्येक मशिनमध्ये कुठला उमेदवार, त्याचे चिन्ह याचा ‘प्रोग्राम’ सेट केला जातो. हे करतानाच प्रत्येक मशिनमध्ये १५ ते २५ टके मते महायुतीला मिळतील, असा प्रोग्राम सेट करण्यात आला. मतदान केंद्रावर ‘मॉक पोल’ घेतला गेला, तेव्हा तो व्यवस्थित दाखवला; कारण प्रोग्राम सेट करताना वेळ सकाळी नऊची ठेवण्यात येते, असा आरोप जगताप यांनी केला आहे. प्रोग्राम अशा प्रकारे सेट झाल्यामुळे निवडणूक आयोगापुढे हे आरोप सिद्ध करण्यास अडचणी आहेत, असेही ते म्हणाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.