Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जेव्हा कुंपणच खातंय शेत…! प्रवाशाच्या दागिन्यांवर एसटी चालकाचा डल्ला, कोल्हापुरातील घटना

7

Kolhapur News: बेळगावला जाण्यापूर्वी चालक सुधीर शिंदे याने एसटीचा किरकोळ मेंटेनन्स करण्याचे कारण सांगून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर वर्कशॉपच्या दिशेला जाऊन काही वेळाने ते परत आले.

महाराष्ट्र टाइम्स
ST Bus og.

म. टा. वृत्तसेवा, सातारा: एसटीच्या गाडीचा किरकोळ ‘मेंटेनन्स’ करण्याच्या निमित्ताने प्रवाशांना खाली उतरवून एसटी वर्कशॉपकडे घेऊन गेलेल्या चालकाने प्रवाशाच्या सीटवरील पर्समधील आठ तोळे दागिने लंपास केले. हा प्रकार सोमवारी (दि. २५) पहाटे साडेतीनच्या सुमारास कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात घडला.

राजश्री आनंदा नलवडे (वय ४०, सध्या रा. ठाणे, मूळ रा. राशिंग, जि. बेळगाव) यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी चार तासांत छडा लावून एसटीचालकास अटक केली. सुधीर लक्ष्मण शिंदे (वय ४२, रा. समर्थगाव, जि. सातारा) असे अटकेतील चालकाचे नाव आहे. शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ठाण्याहून सुटलेली एसटी सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचली. पुढे बेळगावला जाण्यापूर्वी चालक सुधीर शिंदे याने एसटीचा किरकोळ मेंटेनन्स करण्याचे कारण सांगून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर वर्कशॉपच्या दिशेला जाऊन काही वेळाने ते परत आले.
बंडखोरांची घरवापसी नकोच! भाजप निष्ठावंतांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा; पक्षाकडे अहवाल
एसटीत बसताच फिर्यादी राजश्री नलवडे यांनी पर्स तपासली. त्या वेळी पर्समधील दागिन्यांची डबी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी एसटी थांबवून पोलिसांना बोलावले आणि बसची झडती घेण्याची विनंती केली. सोन्याचा हार, कुड्या, वेल, कानातील दागिने अशा आठ तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद त्यांनी दिली. पोलिसांनी एसटीतील प्रवासी आणि वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली.
महत्त्वाची बातमी! राज्यात आता दुचाकीस्वासासह सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती, अन्यथा होणार कारवाई
वर्कशॉपमध्ये एसटी पोहोचल्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत. कर्मचाऱ्यांनी एसटी दुरुस्तीचे काही कामही केले नव्हते. चालकाच्या बोलण्यात विसंगती जाणवत होती. पोलिसी खाक्या दाखवता त्याने कबुली दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.