Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 29 नोव्हेंबर 2024: मिथुन राशीचा खर्च जास्त, बजेट सांभाळा ! सिंह राशीला राजकीय क्षेत्रात यश ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 29 November 2024 In Marathi : 29 नोव्हेंबर मेष, वृषभ सह या राशीच्या लोकांसाठी दिवस उत्तम असून सामाजिक कार्यात तुमची अधिक रुची वाढणार आहे. मिथुनसह या राशीच्या लोकांचा अधिक खर्च होणार आहे, बजेट सांभाळावे. या राशीच्या लोकांनी वादविवादापासून दूर रहावे. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : सुखात वाढ होईल

मेष राशीच्या लोकांना करिअरच्या बाबतीत आजचा दिवस खास लाभ देणारा आहे. नशिबाची साथ मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्याकडे महत्त्वाचे काम सोपवले जाईल आणि तुम्ही स्वतःला सिद्ध कराल. पण तुमच्या सहकाऱ्यांचा मूड बिघडू शकतो. तुम्हाला आज काही त्रासाला तोंड द्यावे लागू शकते.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : करिअरमध्ये शुभ योग

वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये शुभ योग बनतो आहे. तुम्हाला दुपारपर्यंत आनंदाची बातमी मिळेल. प्रकृतीबद्दल सावध राहा. सायंकाळी नातेवाईकांचे आगमन झाल्याने आनंद होईल. पण खर्च वाढणार आहे. आज तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल आणि तुमचे मन प्रसन्न होईल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : खर्च जास्त होतोय, बजेट सांभाळा

मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ आहे. वरिष्ठांकडून किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून बहुमूल्य वस्तू मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही अधिकाधिक व्यस्त राहाल, पण अनावश्यक खर्चापासून सावध राहा. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत घाईगडबड टाळा.
कर्क आर्थिक राशिभविष्य : मान- सन्मान, प्रतिष्ठा वाढेल

कर्क राशीच्या लोकांना भाग्यवृद्धीचे योग आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानक मोठ्या प्रमाणावर पैसे आल्याने मन प्रसन्न होईल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि मान, प्रतिष्ठा वाढेल. घाईगडबड किंवा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय भविष्यात पश्चातापाचे कारण ठरतील.
सिंह आर्थिक राशिभविष्य : राजकीय क्षेत्रात यश मिळेल

सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ असून राजकीय क्षेत्रात उत्तम यश आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात तुम्ही पुढे पुढे वाटचाल करणार आहात. काही थांबलेली कामे पूर्ण होतील. मित्रांसोबत सायंकाळचा वेळ मनोरंजनात जाईल आणि काही पैसे खर्च होतील. खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या.
कन्या आर्थिक राशिभविष्य : भाग्यवृद्धीसह धनलाभाचा योग

कन्या राशीच्या लोकांना भाग्यवृद्धी सह धनलाभाचा योग आहे. तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळेल. रचानात्मक कार्यात मन लागेल. प्रतिकूल परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्या सुटतील. राजकीय मदत मिळेल. सूर्यास्ताच्या वेळी अचानक लाभ होईल.
तूळ आर्थिक राशिभविष्य : उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील

तूळ राशीच्या लोकांना आज दिवस लाभाचा आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत बनतील. तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला विशेष सन्मान प्राप्त होईळ. धावपळ जास्त होईल आणि तसेच हवामानाचीस बदलामुळे तब्येत बिघडू शकते काळजी घ्या. जोडीदाराची मदत प्रत्येक कामात मिळेल.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : रखडलेली कामे सुरु होतील

वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक विषयांत लाभ होईल. धन, सन्मान, यश, कीर्ती यात वाढ होईल. थांबलेली कामे होतील आणि प्रियजनांशी खास भेट होईल. बोलण्यावर संयम न ठेवल्याने प्रतिकूल परिस्थितींनी तोंड द्यावे लागेल. रात्रीचा वेळ प्रियजन किंवा मित्रांसोबत भटकंती आणि मौजमजेत जाईल.
धनू आर्थिक राशिभविष्य : विरोधकांवर मात कराल

धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चाचा दिवस आहे. कौटुंबिक उपभोगांच्या वस्तूंत वाढ होईल. एखाद्या नातेवाईकामुळे तणाव राहील. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा, पैसे अडकू शकतात. दिवसा कोर्टकचेरीच्या फेऱ्या होतील. अखेरीस तुमचा विजय होईल. तुमच्या विरोधातील षड़यंत्र अपयशी होतील.
मकर – वादविवादापासून दूर राहा

आज कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळेल. रोजगाराच्या क्षेत्रात सुरू असलेल्या प्रयत्न यशस्वी होतील. सहकारी आदर देतील आणि कामात मदत करतील. सायंकाळी कोणत्याही वादविवादात पडू नका. रात्री तुमच्या आवडीच्या पाहुण्याचे स्वागत करण्याचे योग बनत आहेत. आईवडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
कुंभ – निराशाजनक वातावरणाचा सामना

आजचा दिवस अनुकूल नाही. आज तब्येत बिघडण्याची शक्यता आहे तसेच अनावश्यक वादविवाद किंवा निराशाजनक वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. एखादी विपरित बातमी ऐकून तुम्हाला आकस्मकि प्रवासाला जावे लागेल. त्यामुळे आज सावध राहावे आणि वादविवादांपासून दूर राहा.
मीन – मौल्यवान वस्तूंची चोरी

आजचा दिवस मुलांची काळजी करण्यात जाणार आहे. मुलांची काही कामे करण्यात तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. वैवाहिक जीवनातील अडचणी संपून जातील. आज सासरच्या मंडळींसोबत देवाणघेवाण करू नका, नातेसंबंध बिघडू शकतात. धार्मिक कार्यावर, तीर्थयात्रांवर खर्च जास्त होईल. प्रवास काळात सावध राहण्याची गरज आहे. आज एखाद्या मौल्यवान वस्तूची चोरी होईल.