Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

श्रीरामपूरची जागा महायुतीच्या अंतर्गत मतभेदाने पडली, विखेंचा घरचा आहेर, मंत्रिपदावर सावध उत्तर

4

| Updated: 28 Nov 2024, 4:07 pm

Ahmednagar : श्रीरामपुर मध्ये महायुतीच्या आपआपसातील मतभेदामुळे ती जागा गेली.ती जाण्याचं खरतर कारण नव्हतं. दुर्दैवाने राम शिंदे यांचा देखील फार कमी फरकाने पराभव झाला. तेथे काही स्थानिक परिस्थीती उदभवली असेल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नगर : विधानसभेच्या घवघवीत यशानंतर भाजपाच्या गोटात उत्साहाचं वातावरण पहायला मिळतंय. कोणतं मंत्रीपद कोणाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी नेत्यांनी मात्र कंबर कसायला सुरूवात केली आहे. मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी बऱ्याच विषयांबद्दल प्रतिक्रीया दिल्या.
“माझ्यामागे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला दिलेल्या संधीच सोनं करत मी चांगलं काम करून दाखवलंय. त्यामुळे जो विश्वास माझ्यावर आधी दाखवला गेलाय तो विश्वास पुन्हा पक्षनेतृत्व व्यक्त करील अशी मला खात्री आहे”. असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे नाराज नाहीत !
माध्यमांनी हे रान उठवलय की एकनाथ शिंदे नाराज आहेत. पण ते नाराज असण्याचं काही कारण वाटत नाही. उलट पक्षनेतृत्व जो निर्णय देईल तो मी मान्य करेन अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. हे सांगतंच, आमची पहिली पसंती हि देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

मंत्रीपदाबाबत काय म्हणाले पाटील ?
मंत्रीपदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्रजींनाच आहेत.त्यामुळे वेगळं काही मागण्याचं कारण नाही.पक्षनेतृत्वाचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे त्यावरून मला खात्री आहे कि निश्चितपणे ते चांगली जबाबदारी मला देतील त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. ठाकरे गट स्वतंत्र निवडणुक लढवणार का ? असे विचारले असता “पराभव झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या पळवाटा आहेत. जनाधार गमावलाय ते कुठं तरी त्यांनी मान्य करायला हवं. उद्धव ठाकेरंनी मोदी आणि शहांवर बेताल विधानं केली. एवढं बेताल विधान करणारा माणूस मी पाहिला नाहीत्याचं शासन त्यांना लोकांनी दिलय.” असं विखे पाटील म्हणाले.

बच्चु कडूंनी विश्वासघात केला(?)
बच्चु कडूंना महायुती सरकारने पाठबळ दिलं. सरकारने दिव्यांगाची धोरणं मान्य केली. त्याच्याशी प्रतारणा करून बच्चु कडू यांनी जो विश्वासघात केला, त्यामुळे त्यांना महायुती मध्ये सामिल करून घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे असे पाटील म्हणाले. EVM विरुद्ध मविआने उचललेल्या पाऊलाबाबत पत्रकारांनी विचारल्यावर, “लोकसभेत आघाडीला घवघवीत यश मिळालं आणि महायुतीची पिछेहाट झाली , त्यावेळी EVM वर का शंका व्यक्त केली नाही ?EVM वर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा देवून टाकायला हवा होता. निवडणुक नाकारायला हवी होती. जनमत स्वतःच्याबाजुने असलं की EVM चांगलं आणि विरोधात गेल की EVM वाईट! शरद पवार जाणते नेते आहेत त्यांनी जनाधार गमावलाय त्यांनी आता घरी बसावं.लोकांचे वाटोळे तुम्ही केलेत, आणखी जनता आणि राज्याचं वाटोळं करू नका”. अशी खरमरीत टिका विखे पाटलांनी शरद पवारांवर केली.

थोरातांना विखे पाटलांचा उपरोधिक टोला...
श्रीरामपुर मध्ये महायुतीच्या आपआपसातील मतभेदामुळे ती जागा गेली.ती जाण्याचं खरतर कारण नव्हतं. दुर्दैवाने राम शिंदे यांचा देखील फार कमी फरकाने पराभव झाला. तेथे काही स्थानिक परिस्थीती उदभवली असेल. नाहीतर जिल्हा हा 12 – O केला असता.बाळासाहेब थोरातांच जे स्वप्न होतं कि जिल्हा 12 – 0 झाला पाहिजे ते आम्ही निश्चितच पुर्ण केल असतं. असा सणसणीत टोला विखे पाटलांनी थोरातांना लगावला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.