Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Teacher Commits Suicide with his Daughter and Wife: शिक्षक मसनाजी सुभाषराव तुडमे (वय ४७), पत्नी कान्होपात्रा ऊर्फ रंजना मसनाजी तुडमे (वय ४२), मुलगी अंजली मसनाजी तुडमे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत.
हायलाइट्स:
- पत्नी, मुलीसह शिक्षकाची आत्महत्या
- गंगाखेडमध्ये रेल्वे रुळावर आढळले मृतदेह
- परभणीमधील हृदयद्रावक घटना
आई-वडिलांसह मुलाचा अंत
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरात अशाच एका कुटुंबाचा अपघातात अंत झाला होता. आपल्या मुलाला परभणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आलेल्या आई वडिलांसह मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. परभणी शहरातून वसमतकडे जाणार्या महामार्गावर आसोला पाटीजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ११ नोव्हेंबर रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात विनानंबरच्या ट्रॅक्टर चालवत असलेल्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
परभणी-वसमत रोडने प्रवास करणारे प्रवासी आणि शेतकर्यांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे आणि स.पोनि बंदखडके तसेच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे, अप्पाराव वराडे, रामकिशन काळे, महामार्ग पोलीस पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक मीना करपुडे, पोलीस उपनिरीक्षक नाटकर, टाकरस,पोना विजय मुरकुटे, अनिल भराडे व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच तिन्ही मृतदेह रूग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलिस प्रशासनास मदत करण्यासाठी पोलिस पाटील पंढरीनाथ रिक्षे, बाळासाहेब जावळे, ग्रा.पं.सदस्य अरुण डहाळे आदींनी पुढाकार घेतला.