Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sanjay raut : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या असून, काँग्रेसच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत फेरमतमोजणीची मागणी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. संजय राऊत यांनी आढाव यांच्या आंदोलनाचा संदर्भ घेत अण्णा हजारे यांना लक्ष्य केले आहे.
आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास हा विषय आणला आहे. बाबा आढाव यांच्यासारखा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ईव्हीएमच्या घोटाळ्याविरूद्ध लोकशाही वाचवण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करत आहे याची जाणीव महाराष्ट्राच्या जनतेने ठेवावी. भले अण्णा हजारे झोपले असतील अन्य सगळे लोक जे ऐरवी क्रांतीच्या मशाली पेटवतात ते झोपले असतील पण लोकशीहीची मशाल विझू नये म्हणून बाबा आढावांसारखा नेता रस्त्यावर उतरला आहे याची आम्ही जाणीव ठेवतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.पोलिसांचा छापा, घरात सापडले लाखाेंचे ड्रग्ज, विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार एजाज खानच्या पत्नीला अटक
बाबा आढाव काय म्हणाले?
देशात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू झालं आहे. रोज लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारी पैशांचा मोठा गैरवापर झाला. लोकसभेचा निकाल आणि त्यानंतर विधानसभा निवडुकीचा लगेच वेगळा निकाल कसा लागतो? असा सवाल करत बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचं सांगत यांच्याविरोधात आवाज उठवण्याचं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.मदरशामध्ये भयंकर घडलं! पानटपरीवाल्यामुळे धक्कादायक प्रकार उघडकीस, मौलानाने त्या रात्री…
दरम्यान, भाजप पक्षाला यांच्याकडून जे काम होतं करायचं होतं ते करून झालंय. महाराष्ट्र त्यांनी कमजोर केला, राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन पक्ष फोडण्यासाठी यांची मदत घेतली आणि वापर केला. आता त्यांचं कार्य संपलं आहे. भविष्यामध्ये जर यांचे पक्ष फोडले आणि भाजपने बहुमत स्थापन केलं तर कोणाला आश्चर्य वाटणार नसल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.