Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Nov 2024, 5:52 pm
Baba Adhav : भाजपला मतदान तरी कोण करतंय असा सवाल धरणे आंदोलनातील समीउल्ला शेख यांनी उपस्थित केला आहे. बाबा आढाव यांच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावरवर उतरू अशा इशारा त्यांनी दिला आहे.
संपूर्ण देशात उत्सुकतेचा विषय ठरलेल्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल गेल्या आठवड्यात शनिवरी लागला. महाराष्ट्राच्या राजकारणातील नाटकीय अंकावरचा पडदा अखेर उठला. २८८ पैकी २३२ जागांवर ‘आघाडी’ घेत महायुतीने महाविजय मिळवला. त्यातही सर्वाधिक जागा या भाजपाने मिळवल्या. ‘न भूतो,न भविष्यती’ असा महायुतीचा विजय झाला. या विजयासोबतच भारतीय लोकशाहीच्या अस्तित्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे. एक हाती सत्ता आल्याने, शिवाय ज्या ठिकाणी भाजप विरूद्ध परीस्थिती होती त्याही ठिकाणी लाखोंच्या संख्येने मतं मिळाल्याने EVM यंत्रणेबद्दल शंकेची पाल चुक-चुकते आहे. मतदारांनी मतं नेमकी कोणाला दिली? EVM मशीन्ससोबत जाणीवपुर्वक, विशिष्ट हेतू पूर्तीसाठी छेडछाड केली का? हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
भाजपवाल्यांना मतदान तरी कोण करतय?;सोलापूरकरांनी उपस्थित केला प्रश्न
भारतीय जनता पार्टी इतक्या मताधिक्याने निवडून येईल अशी शाश्वती कुणालाच नव्हती.भाजपला मतदान तरी कोण करतंय असा सवाल धरणे आंदोलनातील समीउल्ला शेख यांनी उपस्थित केला आहे. बाबा आढाव यांच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावरवर उतरू अशा इशारा त्यांनी दिला आहे.
सोलापुरातील निकालावर संशय-
सोलापूर उत्तर, सोलापूर शहर, मध्य-दक्षिण सोलापूर, आणि अक्कलकोट मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. सोलापुरात या चार मतदार संघात भाजप विरोधात वातावरण असताना बीजेपीच्या या उमेदवारांना एक-एक लाख मतदान कसे पडले, असा सवाल सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.