Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली; ५ डिसेंबर दुपारी एक वाजता महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार
Maharashtra CM Oath Ceremony: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जवळ जवळ दोन आठवड्यांनी राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता असल्याचे भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत बोलताना राहुल नार्वेकर यांनी देखील वक्तव्य केले आहे. पाच तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या सरकारचा शपथविधी ५ तारखेला दुपारी १ वाजता आझाद मैदानावर होणार आहे. अर्थात याबाबत भाजपकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
त्याआधी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ३ तारखेला दुपारी १ वाजता होणार आहे. या बैठकीत विधिमंडळातील नेत्याची निवड केली जाणार आहे. आमदारांच्या या बैठकीसाठी नवी दिल्लीतून निरीक्षक येणार आहेत.
Journey Of Waqf In India: २ गावांना दान देण्यापासून सुरू झाले वक्फ, आज ९.४ लाख एकरचे साम्राज्य; इतिहास, कायदेशीर वाद सर्व काही एका क्लिकवर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य राज्यातील काही मुख्यमंत्री तसेच एनडीएमधील महत्त्वाचे नेते उपस्थित राहू शकतात. राज्यातील विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर बाजी मारली होती.
भाजपकडून अद्याप मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावाची घोषणा झालेली नाही. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असले तरी त्याबाबत आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. याआधी २०१४ साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते त्यांनी वानखेडे मैदानावर शपथ घेतली होती. तर २०१९ साली त्यांनी राजभवनात शपथ घेतली होती. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून या पदासाठी दावा करण्यात आलेला नाही.