Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Thane Yuva Sena : ठाण्यात युवासेनेची कोरकमिटी बैठक घेण्यात आली. या बैठकीत भविष्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करुन काही ठराव मंजूर करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचीही चर्चा या बैठकीत करण्यात आली.
Maharashtra CM : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हाय कमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र?
शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. यावेळी युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. युवासेनेसाठी महत्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले. संघटनात्मक पुनर्रचना, युवकांचा सहभाग, महिलांचे सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला.
लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादाच! त्यांना मुख्यमंत्री करा, सत्तास्थापनेच्या पेचात राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी
महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये युवासेनाचा विस्तार, राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, समुदायीक संपर्क मोहिम राबविणे तसेच सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते. विशेषत: दुर्बल घटकांतील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेना शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला.
हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. महाराष्ट्राला प्रगतीशील व सर्वसमावेशक राज्य बनवणे हा त्या मागील उद्देश आहे. या दृष्टीने सर्व युवा सैनिकांनी जोमाने कामाला लागावे व प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
‘युवासेना एकसाथ, पालिका निवडणुकांमध्येही एकनाथ’, ठाण्यात युवासेनेची कोर कमिटीची बैठक, ठराव मंजूर
नव्या घोषवाक्याची चर्चा
‘युवासेना एकसाथ, पालिका निवडणुकांमध्येही एकनाथ’ हे नवे घोषवाक्य बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मांडण्यात आले. या दृष्टीने सर्व युवासैनिकांनी जोमाने कामाला लागावे, प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा, असेही आवाहन या बैठकीत केल्याची माहिती प्रवक्ते राहुल लोंढे यांनी दिली