Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रविंद्र चव्हाणांनी फासे टाकले, कोकणातील मतदार महायुतीकडे वळले; नव्या नेतृत्वामुळे राणे कुटुंबासाठी धोक्याची घंटा?
Ravindra Chavan Emerge as Frontline Leader in Konkan : महायुतीने कोकणपट्ट्यात ३९ पैकी ३५ जागा जिंकून कोकणातला विजयाचा स्ट्राईक रेट ९० टक्क्यांवर पोहोचवला आहे. त्याचे श्रेय प्रामुख्याने भाजपा नेते आमदार रविंद्र चव्हाण यांना दिले जात आहे.
सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या डोंबिवलीसारख्या मोठ्या शहराचे रा. स्व. संघ आणि भाजपच्या विचारधारेशी अतूट नाते असलेले रविंद्र चव्हाण प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाते आणि संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज ही चव्हाण यांची खासियत आहे. त्यामुळे एकाच वेळेस संघाची वैचारिक बैठक आणि संघटनेच्या ताकदीवर लढणाऱ्या नेत्यामुळे महायुतीला यश मिळाले आहे. लोकसभा निवडणूकीचा अपवाद वगळता विधानसभा निवडणूक असो किंवा मग विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, गेल्या काही महिन्यांत महायुतीला यश मिळत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची निवडणूक प्रचार यंत्रणा प्रमुखपदाची जबाबदारी रविंद्र चव्हाणांवर होती.
महाराष्ट्राला ५ डिसेंबर रोजी मिळणार नवे सरकार; आझाद मैदानावर PM मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी सोहळा
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात रविंद्र चव्हाण यांनी कधी पालघर, तर कधी रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा महत्वाच्या मतदारसंघात संघटनात्म पातळीवर काम केले. तसेच कार्यकर्त्यांच्या बैठका घेत प्रचाराचे सूक्ष्म नियोजनही केले. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत कोकणातील ३९ जागांपैकी ३५ जागांवर भाजप-महायुतीचा विजय झाला. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्षाला मात देत ६ पैकी ५ जागांवर महायुतीने विजयाचा ध्वज फडकावला.
रविंद्र चव्हाण यांच्यामुळेच कोकण तसेच पालघर भागातील जनतेने महायुतीला कौल दिला, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परिणामी कार्यकर्त्यांमध्ये आणि रविंद्र चव्हाण समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोकणात आता नारायण राणे यांच्याबरोबर रविंद्र चव्हाण यांचे हे नेतृत्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रोजेक्ट होत असल्याने हा इशारा नेमका कोणासाठी याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.