Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ratnagiri News : एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेसाठी कुठलाही अडसर येणार नाही, असं जाहीर केलं असलं, तरी सरकारमध्ये ते मोठ्या पदावर असावेत अशी आमची सर्वांची इच्छा असल्याचं विधान उदय सामंत यांनी केलं आहे.

शिंदे साहेब मोठ्या पदावर राहावेत ही आमची इच्छा –
राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या प्रोसेसमध्ये राहावं, सरकारमध्ये मोठ्या पदावर असावेत, अशी आमची सगळ्यांची इच्छा असून आम्ही ही इच्छा सहकाऱ्यांनी त्यांच्याजवळ बोलून दाखवली आहे. सगळ्या निर्णयाचे अधिकार आम्ही त्यांना दिले आहेत, आमच्या मागणीला मुख्यमंत्री मान देतील असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये मोठ्या पदावर राहतील असे सूतोवाच सामंत यांनी केले आहेत.
undefined
निकालामुळे आघाडीचे नेते सैरभैर झालेत
निवडणुकीत पैशाचा वापर झाला आणि ईव्हीएम यंत्राबाबत महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतले आहेत. २२ आमदारांनी पुन्हा मतमोजणी करण्यासाठी फी भरली आहे. यावर शिवसेना नेते उदय सामंत यांनी भूमिका मांडली आहे.
ईव्हीएम मतदान यंत्राची तपासणी करावी, लंडन अमेरिकेतून शास्त्रज्ञांना तुमच्यातून कोणी शास्त्रज्ञ झाले असतील तर त्यांना तपासायला सांगा आम्हाला कसली भीती नाही, असं सांगत पैशाचा वापर झाल्याचं कोण सांगत असेल तर हा लोकशाहीतला हा फार मोठा आक्षेप आहे. मतदारांवर आपण आक्षेप घेतो आहोत याची देखील जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. जो निकाल लागला आहे, त्यामुळे सगळे सैरभर झाले आहेत. त्यामुळे एक कलमी कार्यक्रम महायुतीच्या नेत्यांना आणि सहकार्यांना बदनाम करणं एवढाच उरला आहे, असाही टोला सामंत यांनी आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.Baba Adhav : बाबा आढावांनी उपोषण सोडलं; आता सत्तामेव जयते सुरू…उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला
नाना पटोले यांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला
नाना पटोले हे जसे काँग्रेसमध्ये कायम राहिले आहेत पदावर, त्याप्रमाणे त्यांना आमदारकीवर राहता आलं नाही, फार झटापट करावी लागली. ते पोस्टल मतांवर निवडून आले आहेत. माझी त्यांना मित्र म्हणून विनंती आहे की ते ज्या पद्धतीने आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत त्यांना त्यांनी आवर घालायला पाहिजे आणि जे मतदान महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या पारड्यात टाकलं आहे, ते एवढं कमी का टाकले? याचं आत्मचिंतन त्यांनी करावं असाही सल्ला सामंत यांनी दिला आहे.
शपथविधीच्या आधी उदय सामंत भडकले; म्हणाले… ते सैरभैर झालेत, आम्हाला कसली भीती नाही
सेमीकंडक्टर या मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू
सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा सेमी कंडक्टरचा मोठा प्रोजेक्ट रत्नागिरीत आणला आहे. त्याचं काम सुरू आहे. आणखीन जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये मुलांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे, त्याची प्रक्रिया कंपनीच्या प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. राजापूर बारसू येथील रिफायनरी बाबत लोकांची जी भूमिका आहे, मागणी आहे, त्याप्रमाणे तेथे प्रकल्प आणला जाईल, असे म्हणत रिफायनरी रद्दचे संकेत त्यांनी दिले आहेत.