Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Raj Thackeray MNS Facebook Poem : महाराष्ट्रात मराठी भाषेत न बोलणारे रिक्षाचालक, रस्ते, खड्डे, टोल, भोंगे, रेल्वेभरती परीक्षा, सणांवरील निर्बंध, महिला सुरक्षा असे अनेक विषय गुंफून ‘बघ माझी आठवण येते का?’ या कवी सौमित्र यांच्या प्रख्यात कवितेचं विडंबन पाचंगेंनी शेअर केलं आहे.

मनसेने सामान्य माणसांसाठी केलेल्या कामांचे दाखले देत संदीप पाचंगे यांनी त्रागा व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत न बोलणारे रिक्षाचालक, रस्ते, खड्डे, टोल, भोंगे, रेल्वेभरती परीक्षा, सणांवरील निर्बंध, महिला सुरक्षा असे अनेक विषय गुंफून ‘बघ माझी आठवण येते का?’ या कवी सौमित्र यांच्या प्रख्यात कवितेचं विडंबन पाचंगेंनी शेअर केलं आहे.
मनविसे अध्यक्ष व मनसे नेते अमित ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या संदीप पाचंगे यांनी २०१९ आणि यंदाही ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मनसेच्या स्थापनेपासून पक्षाचे काम करणाऱ्या पाचंगे यांनी विविध आंदोलनाद्वारे नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे कविता?
बघ माझी (मनसे) आठवण येते का?
सकाळी घरातून कामाला जायला निघ
रिक्षावाल्याला विचार स्टेशनला येतो का?
तो म्हणेल “हिंदी मे बात करो”
तू चिडशील महाराष्ट्रात मराठीतच बोलावे लागेल म्हणशील
तो उर्मटपणे बोलेल
‘हिंदी राष्ट्रभाषा है, नही बोलूंगा’
बघ माझी आठवण येते का?
गणपतीसाठी कोकणात गावी जायला ट्रेनची बुकिंग कर
मुले CBSE, ICSE शाळेत शिकत असतील,
ते म्हणतील डॅडी आमची परीक्षा आहे,
शाळेला सुट्टी नाही
बघ माझी आठवण येते का?
गाडी काढ घरच्यांना घेऊन फिरायला जा
रस्ता खराब असेलच, खड्ड्यातून मार्ग काढ
टोल लागेल.. गुपचूप टोल भर
बघ माझी आठवण येते का?Raj Thackeray : बंद दाराआड बैठक आणि राज ठाकरे हमसून हमसून रडू लागले; काय घडलेलं त्या दिवशी?
मुलगा मुलगी दहावी-बारावीची परीक्षा देत असतील
सकाळी सहा वाजता उठून अभ्यासाला बसतील
अचानक भोंग्याचा आवाज येईल
तुला विचारतील बाबा भोंगे तर कोर्टाने बंद
करायला सांगितले ना?
बघ माझी आठवण येते का?
मुलं मोठी झाली की त्यांना, रेल्वेत भरती व्हायचे असेल
सर्व जागा महाराष्ट्रा बाहेरच्या राज्यातील तरूणांना मिळतील
ते विचारतील बाबा महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरीची संधी आहे हे न कळता बाकीच्या राज्यात कसे काय कळते?
परीक्षा मराठीत का होत नाहीत?
बघ माझी आठवण येते का?
Sandeep Pachange : मराठीचा आग्रह ते भोंगे, टोल… राज ठाकरेंच्या शिलेदाराची विडंबन कविता; बघ, मनसेची आठवण येते का?
दहीहंडी, गणेशोत्सव यासारख्या सणांवर कोर्टाचे व सरकारचे निर्बंध येतील,
मुलं विचारतील लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरू केला होता ?
हिंदू सण पूर्वीसारखेच का साजरे होत नाहीत
बघ माझी आठवण येते का?
मुंबई ठाण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पाहशील
बॅकेतून कर्ज काढ घर घ्यायला जा
मांसाहार करतोस म्हणून तुला घर नाकारतील
बघ माझी आठवण येते का?Eknath Shinde : सगळ्या मागण्या ऐकू, पण चौघांना मंत्रिपद नाही म्हणजे नाही! भाजपची अट, शिवसेनेतून कुणाचा पत्ता कट?
कामावरून घरी थकून भागून येशील बायको सांगेल छकुलीचा शाळेत विनयभंग झालाय…
तुझी तळपायाची आग मस्तकात जाईल,
पोलिसात तक्रार करायला जाशील,
कारवाईला टाळाटाळ होईल,
व्यवस्थेची चीड येईल, हताश होशील
बघ मनसेची आठवण येते का?
खरं तर मनसेची आठवण यावी असे खूप प्रसंग येतील
असो सहज सुचले म्हणून लिहून टाकले सोशल मीडियावर
तुमचा महाराष्ट्र सैनिक… संदीप पाचंगे