Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nashik Tempreture: भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्यापूर्वीच्या बारा तासांतील ही तापमान नोंद आहे. बीड; तसेच सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर येथे १०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

थंड वाऱ्यांच्या प्रवाहाचा वेग आठ दिवसांपासून वाढल्याने नाशिक शहर व जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागांत चोवीस तास गारठा जाणवत असताना शनिवारी तापमान आणखी घसरले. राज्यात नाशिक सर्वाधिक गारेगार असल्याची नोंद झाली. शनिवारी पहाटे शहरात ८.९ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरमध्ये आठ अंशांपर्यंत पारा घसरल्याची ही २०१६ नंतरची नोंद ठरली, असे हवामान विभागाने सांगितले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.फडणवीसच मुख्यमंत्री? भाजप पक्षश्रेष्ठींकडून नावावर शिक्कामोर्तब, अखेर अनिश्चितता दूर
नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात शहरात किमान १२ अंश सेल्सियसपर्यंत तापमान स्थिर असल्याने थंडी जाणवत होती. तर, शेवटच्या आठवड्यात पारा १० अंशांपर्यंत स्थिरावल्याने पहाटे धुक्याची दुलई शहराने पांघरण्यास सुरुवात केली. या तापमानात नोव्हेंबर अखेरीस दोन अंश सेल्सियने घट होत पारा आठ अंशांपर्यंत घसरला आहे. पुढील दोन दिवस तापमान आठ ते दहा अंशांपर्यंत स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर व पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही थंडीचा कडाका वाढल्याची नोंद झाली. पुढील दोन दिवस नाशिकमध्ये पहाटे काही भागात धुके असेल. त्यानंतर तापमानात काहीशी वाढ होणार असली, तरी तापमान १२ अंशांपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.
कडाका वाढणार
यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झाल्याने थंडीचाही कडाका वाढणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘ला निना’चा प्रभाव सक्रिय होण्याच्या शक्यतेमुळे तीव्र हिवाळ्याची शक्यता आहे. त्यामध्ये पूर्वेकडील वारे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकलतात आणि समुद्राची पृष्ठभाग थंड करतील. तेव्हा सामान्य तापमानापेक्षा थंडीचा पारा अधिक घसरेल. मात्र, हिवाळ्याच्या तीव्रतेबद्दल अद्याप स्पष्ट अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला नाही.Sanjay Shirsat: गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम सांभाळू! संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चेला उधाण
दापोलीत गारठा
रत्नागिरी : कोकणात दापोलीमध्ये तापमानाचा पारा आठ अंशांपर्यंत घसरला आहे. कोकणाच्या अनेक भागांत काही दिवसांपासून थंडीची लाट असून दापोलीमध्ये १० ते १२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद होत होती; परंतु शनिवारी पहाटे ८.१० अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
महाबळेश्वरमध्ये १०.५ अंश तापमानाची नोंद
सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात आणखी उतार आला असून, शुक्रवारी महाबळेश्वरात १०.५; तर सातारा शहरात १२ अंशाची नोंद झाली आहे, हे या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. पारा खालावल्याने जिल्ह्यातील गारठ्यात चांगलीच वाढ झाल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात दर वर्षी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते; पण यंदा नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली. मागील १५ दिवसांत थंडीचे प्रमाण वाढले. गेल्या चार दिवसांत किमान तापमानात दोन अंशाचा उतार आला आहे.