Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वेगाने केला प्रवाशांचा घात, ३५ मिनिटात कापले ३० किमी अंतर; गोंदिया बस अपघातात मोठी अपडेट

5

Godia Shivshai Bus Accident: गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा हा अपघात असून, शुक्रवार काळा दिवस ठरला. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते गोंदिया हा वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर वाहने नेहमी सुसाट धावतात.

हायलाइट्स:

  • वेगाने केला प्रवाशांचा घात
  • ३५ मिनिटात कापले ३० किमी अंतर
  • गोंदिया बस अपघातात मोठी अपडेट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
गोंदिया बस अपघात मोठी अपडेट

गोंदिया : भंडाऱ्याहून गोंदियाकडे जाणाऱ्या शिवशाही बसच्या भीषण अपघातात शुक्रवारी ११ प्रवासी ठार झाले. घटनेनंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी करून चौकशी केली. कोहमारा ते डव्वा रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बस भरधाव वेगात असल्याचे समोर आले. चालकाचे एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात बसवरून नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. सुमारे वीस फूट अंतर घासत गेली. रस्त्याच्या कडेची लोखंडी रेलिंगही तुटली. चालकाने चक्क ३५ मिनिटांत दोन थांबे घेत ३० किमी अंतर कापले असल्याचे माहिती प्राथमिक तपासात पुढे आली असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.घटनेनंतर पोलिस, एसटी महामंडळाचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत बसचे प्रवासी आणि प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सर्वच यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली. यात प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बसची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात बस फारच वेगात असल्याचे समोर आले. ओव्हरटेकच्या नादात ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले आहे.
Ravindra Chavan: नगरसेवक ते मंत्रिपद; फडणवीसांचे निकटवर्तीय, सीएपदासाठी चर्चेत असलेले रवींद्र चव्हाण कोण?

गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा हा अपघात असून, शुक्रवार काळा दिवस ठरला. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते गोंदिया हा वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर वाहने नेहमी सुसाट धावतात. वेगावर नियंत्रण नसते. कोहमारा ते मुंडीपारपर्यंत रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे किमान या ठिकाणी तरी वेग कमी असायला हवा. परंतु, चालक बेभान होऊन या मार्गावरून वाहने सुसाट पळवत असतात. परिणामी, लहान-मोठ्या घटना नेहमीच या मार्गावर घडतात. चालकांचा वाहन चालविण्याचा वेगच प्रवासी आणि सर्वसामान्यांच्या जीवावर उठला आहे. प्रशासकीय यंत्रणाही वाहनचालकांच्या मुसक्या आवळण्यात सपशेल अयशस्वी ठरली आहे. असेच वारंवार घडणाऱ्या घटनांवरून दिसून येते.

आजी-नातवावर उपचार सुरू

या बसमधून एकाच कुटुंबातील चार जण प्रवास करीत होते. यात पती-पत्नीचा मृत्यू झाला तर मुलगा आणि आई थोडक्यात बचावले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील सय्यद कुटुंबीय साकोली येथील नातेवाइकाच्या लग्नात गेले होते. लग्न समारंभ आटोपून ते घरी येत असताना या बसच्या अपघातात अजहर अली सय्यद (वय ५५) व आरिफा अजहर सय्यद (वय ५२) यांचा मृत्यू झाला. तर खतीजाबी बासतअली सय्यद (वय ७०), नातू अल्तास अजहरअली सय्यद (वय १४) हे जखमी झाले. दोघांवर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
‘बॉलिवूडमध्ये कधीच काम करणार नाही’ सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्याचा खुलासा

मुलीच्या भेटीला निघाले पण…

अपघातातील मृतांमध्ये साकोली तालुक्यातील चांदोरी (उसगाव) येथील रामचंद्र बबलू कनोजे (वय ६५) आणि अंजिरा रामचंद्र कनोजे (वय ६०)या दाम्पत्याचा समावेश आहे. दोघेही डोंगरगड येथे मुलीच्या भेटीसाठी निघाले होते. परंतु, काळाने घात केला आणि अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला.

बस चुकली अन्‌…

साकोली तालुक्यातील कुंभली येथील प्रकाश हेमने यांची परिस्थिती बेताची असल्याने ते रायपूर येथे मुलासह कंपनीत कामासाठी राहतात. त्यांच्या विवाहित मुलीच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ते आठ दिवसांपूर्वी रायपूरवरून कुंभली येथे आले होते. गुरुवारी ते परत रायपूरला जाणार होते. परंतु, त्यांची नागपूर-रायपूर ही बस साकोली येथे चुकल्यामुळे ते परत घरी गेले. मुलांचा फोन आल्यामुळे शुक्रवारी परत ते नागपूर-गोंदिया या शिवशाही बसने गोंदियाला जायला निघाले होते. गोंदियावरून रेल्वेने रायपूरला जाणार होते. तेथे रेल्वे स्टेशनवर त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येणार होता. परंतु, काळाने घात केला.
जो रुटची ऐतिहासिक कामगिरी; कसोटी क्रिकेटमध्ये हाहाकार माजवला; अखेर सचिन तेंडुलकरांचा वर्ल्ड रेकाॅर्ड मोडला

दोन मृतांची ओळख पटली

अपघातातील दोन मृतकांची ओळख पटली असून दोन्ही मृतक हे भंडारा जिल्ह्यातील लाखनी व साकोली तालुक्यातील आहे. उदाराम खेडकर(वय ७०) रा. राजेगाव मोरगाव, ता. लाखणी व प्रकाश हेमने (वय ५५) रा. कुंभली ता. साकोली अशी मृतकांची नावे आहेत. या अपघातातील ११ मृतकांपैकी सहा हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक व गोंदिया जिल्ह्यातील तीन प्रवाशांचा समावेश आहे. पोलिस विभागात कार्यरत स्मिता सूर्यवंशी यांच्यावर मोरगाव अर्जुनी येथे पोलिस विभागाच्यावतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.