Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mohan Bhagwat: लोकसंख्येच्या दरात होत असलेली घट चिंतेचा विषय आहे. लोकसांख्यिकीच्या नियमानुसार लोकसंख्येचा वृद्धीदर २.१ पेक्षा कमी नसावा, असं भागवत म्हणाले. ते नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते.

आधुनिक लोकसंख्या विज्ञानानुसार, जेव्हा एखाद्या समाजाची संख्या (प्रजनन दर) २.१ पेक्षा कमी होते, तेव्हा तो समाज जगातून नष्ट होतो. त्या समाजावर कोणतंही संकट न येताही तो समाज नामशेष होतो. याचप्रकारे अनेक भाषा, अनेक समाज नष्ट झाले. त्यामुळ लोकसंख्या वाढीचा दर २.१ च्या खाली जाता कामा नये, असं भागवत यांनी म्हटलं.चर्चेत नावं चार, संघाचा स्पष्ट नकार; आम्हाला अजिबात मान्य नाही; RSSचा भाजपला स्पष्ट संदेश
‘आपल्या देशानं १९९८ किंवा २००२ मध्ये लोकसंख्या धोरण तयार केलं. लोकसंख्येचा वृद्धी दर २.१ च्या खाली जाता कामा नये असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. जर आपण लोकसंख्या वाढीचा दर २.१ विचारात घेतला, तर आपल्याला दोनपेक्षा अधिक मुलांची गरज आहे. तीन तर असायलाच हवेत. लोकसंख्येचं विज्ञान हेच सांगतं. समाज टिकायला हवा यासाठी संख्या महत्त्वाची आहे,’ असं भागवत पुढे म्हणाले.
प्रजनन दर नेमका काय?
भारतात आदर्श प्रजनन दर २.१ इतका आहे. याचा अर्थ एका महिलेनं तिच्या जीवन काळात सरासरी २.१ मुलांना म्हणजेच २ पेक्षा अधिक मुलांना जन्म द्यायला हवा. हा आकडा जागतिक आरोग्य संघटनेनं निश्चित केला आहे. देशातील लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी २.१ प्रजनन दर गरजेचा आहे. असं न झाल्यास लोकसंख्येचं असंतुलन बिघडू शकतं. एका महिलेला सरासरी किती मुलं यावरुन त्या देशाचा किंवा समाजाचा प्रजनन दर समजतो.Eknath Shinde: ‘शाही’भेटीत शिंदेंच्या ४ प्रमुख मागण्या; चौथ्या मागणीनं भाजपात खळबळ, सत्ता वाटपाचा पेच कायम
देशात एक समान लोकसांखिकी योजना नसल्यास देशातील लोकसंख्येचा संतुलन बिघडण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचं संघाकडून सातत्यानं सांगण्यात येत आहे. हिंदूंना अधिक मुलं असावीत, अशी विधानं भाजपचे काही नेते करत सांगतात. विशेष म्हणजे संघाशी अधिक जवळीक असणाऱ्या भाजप नेत्यांकडूनच अशी विधानं केली जातात.