Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

माझी तब्येत बरी आहे, मी गावाला यायचं नाही का? CM पदाबाबत शिंदे म्हणाले- मुख्यमंत्री व्हावं अशी…

17

Eknath Shinde On His Health And maharashtra CM : एकनाथ शिंदे तब्येत बरी नसल्याने साताऱ्यात त्यांच्या गावी पोहोचले होते. मात्र आता लगेच ते मुंबईत पोहोचणार आहे. नुकतंच पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि त्यांच्या तब्येतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

माझी तब्येत बरी आहे, मी गावाला यायचं नाही का? CM पदाबाबत शिंदे म्हणाले- मुख्यमंत्री व्हावं अशी…

संतोष शिराळे, सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने ते शनिवारी साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी पोहोचले होते. त्यांना ताप आणि घशाचा संसर्ग झाला असल्याची माहिती एकनाथ शिंदेंच्या डॉक्टरांनी दिली. मात्र अचानक ते रविवारी पुन्हा मुंबईत येणार असल्याचं समोर आलं. तब्येत बरी नसतानाही शिंदे साताऱ्याहून मुंबईत येत असल्याच्या माहितीनंतर एकच चर्चा सुरू झाली. आता या सर्व चर्चांवर स्वत: एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे आजारी, गावी आराम करणार होते, पण आता अचानक मुंबईत येणार, कारण काय?

गावी यायचं नाही का? एकनाथ शिंदेंचा सवाल

पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आता तब्येत माझी बरी आहे. निवडणुकीच्या काळात मी थकलो होतो. त्यामुळे आराम करण्यासाठी गावी आलो होतो. मला इथे आल्यावर आनंद मिळतो. सत्ता स्थापन होत असताना मी गावाला यायचं नाही का? असं काही नियम आहे का? मी नेहमी गावी येतो. ही निवडणूक महायुती प्रचंड मताने जिंकली असून जनतेच्या मनातील सरकार आता स्थापन होईल. गेल्या अडीच वर्षांची आमच्या विकास कामाची ही पोच पावती आहे. जे प्रकल्प मागील अडीच वर्षांपूर्वी थांबवले होते ते वेगाने सुरू केले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विविध योजना झाल्या त्यापेक्षा सर्वात जास्त योजना आम्ही राबवल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात या झालेल्या योजना सुवर्ण अक्षरात लिहिल्या जातील, असं ते म्हणाले.
Maharashtra CM : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हाय कमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र?

जनतेच्या मनामध्ये राहून मी काम केलं….

मी गावी आल्यानंतर मला वेगळा आनंद मिळतो. मला सर्वसामान्यांच्या गरिबीची जाणीव आहे. मी मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा आहे, पण जनतेच्या मनामध्ये राहून मी काम केलं. हे जनतेचे प्रेम आहे. कॉमन मॅन समजून मी काम केलं आहे. कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यामध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती. मोदी आणि अमित शाह जे निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल याबाबत मी स्पष्ट केलं, असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री पद? एकनाथ शिंदे म्हणाले…

लोकांना जी आश्वासन दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मला काय मिळालं, दुसऱ्याला काय मिळालं हे महत्त्वाचं नसून जनतेला काय मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदे यांच्याबाबत आपण पत्रकारच चर्चा करत असता. पण या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित शाह यांच्यासोबत झाली आहे. दुसरी बैठक आमची तिघांची होईल, त्यामधून योग्य तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…
लोक काय बोलतात? विरोधक काय बोलतात? त्यांना काही काम राहिलेलं नाही. आमच्यामध्ये कोणताही समन्वयाचा अभाव नाही. विरोधकांना काही काम नाही. अगदी विरोधी पक्षनेता देखील होता येत नाही एवढं संख्याबळ आता त्यांचं कमी आहे, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला. लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग या विजयामध्ये आहे. या भावांनी, शेतकऱ्यांनी आम्हाला प्रेम दिलं, या सर्वांच्या आशीर्वादामुळे ही निवडणूक आम्ही जिंकलो, असं म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले.

माझी तब्येत बरी आहे, मी गावाला यायचं नाही का? CM पदाबाबत शिंदे म्हणाले- मुख्यमंत्री व्हावं अशी…

ईव्हीएमवर काय म्हणाले शिंदे?

झारखंडमध्ये ते जिंकले त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता, लोकसभेमध्ये ते जिंकले त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएम खराब आहे, जेव्हा जिंकता त्यावेळेस ईव्हीएम चांगला आहे, अशी विरोधकांची भूमिका आहे. फेरमतमोजणी बाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर ईव्हीएम घोटाळ्यावरुन टीका केली आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.