Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Kannad Vote Counting: कन्नडच्या तळणेर मतदान केंद्रात चुकीची मतमोजणी झाल्याची बातमी समाजमाध्यमांवर पसरत होती. या बातमीत किती सत्यता आहे जाणून घ्या

छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड या विधानसभा मतदारसंघातील तळणेर मतदान केंद्र क्रमांक ८० येथे चुकीचं मतदान झालं आहे असं प्रसारमाध्यमांवर बातम्या प्रसारित होत होत्या. याघटनेची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला. तसेच, त्यांनी या घटनेबाबतचं सत्यही समोर आणलं आहे.
मतदान केंद्रावर मतदान होत असताना जे मतमोजणी मतदार प्रतिनिधी असतात त्यांनी लिहिलेली आकडेवारी आणि मतमोजणी केंद्रावर जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतात जे मतमोजणी करत असताना. त्यांनी प्रत्यक्ष मतमोजणी होत असताना त्यांच्या कागदावर जी आकडेवारी लिहून घेतली. ती आकडेवारी पुन्हा फेअर करुन लिहून देत असताना एका मतदान केंद्राची आकडेवारी दुसऱ्या मतदान केंद्राच्या आकडेवारीवर हाताने लिहून दिली, त्यामुळे त्याची टोटल ही जास्त झाली. तर प्रत्यक्ष मतमोजणीत जे कंट्रोल युनिट आहे त्यावरील आकडेवारी आणि ही आकडेवारी यांच्यात तफावत आहे, अशा पद्धतीचं चित्र उभं केलं होतं.
याबाबत कळताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित उमेदवारांना बोलावून सर्व रेकॉर्ड दाखवला, प्रत्यक्ष मतदान केंद्रावर झालेलं मतदान आणि मतमोजणीवेळी निघालेलं मतदान हे समान आहे, यामध्ये एकाही मताची तफावत नाही.
मतमोजणी प्रतिनिधींनी लिहिताना चूक केली आणि त्यामुळे हा गोंधळ झाला. मतांमध्ये एकाही मताची तफावत नाही, जेवढं मतदान झालं होतं, तेवढंच मतमोजणीत निघालं आहे, असं दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केलं.
निष्कर्ष
त्यामुळे सजगच्या पडताळणीत असं समोर आलं आहे की छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यातील १०५ –कन्नड या विधानसभा मतदारसंघातील तळणेर मतदान केंद्र क्रमांक ८० मधील मतदान आकडेवारीबाबत समाज माध्यमांवर जी माहिती पसरवली जात होती ती चुकीची होती.