Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

CM कोण? सस्पेन्स संपला, भाजप नेतृत्त्वाचा निर्णय झाला; बड्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट

15

Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापन करता आलेली नाही. यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या गटातून मोठी बातमी आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या महायुतीला अद्याप सत्ता स्थापन करता आलेली नाही. यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या गटातून मोठी बातमी आहे. भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं याबद्दलची माहिती दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक २ किंवा ३ डिसेंबरला होणार असल्याची माहिती या नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिली.

महायुती २.० सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहतील. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलं. मुख्यमंत्रिपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते राज्यातील दुसरेच नेते ठरले. २०१९ मध्ये शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसोबत राजभवनात सकाळी उरकलेला शपथविधी चांगलाच गाजला. मात्र हे सरकार केवळ साडे तीन दिवस टिकलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

महायुती २.० सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहतील. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलं. मुख्यमंत्रिपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते राज्यातील दुसरेच नेते ठरले. २०१९ मध्ये शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्यानंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसोबत राजभवनात सकाळी उरकलेला शपथविधी चांगलाच गाजला. मात्र हे सरकार केवळ साडे तीन वर्ष टिकलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
नवं सरकार स्थापन होताच सामान्यांना जोरदार दणका? ‘तो’ प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आठवडा उलटला आहे. तरीही महायुतीत सत्ता वाटपाचा पेच कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार भाजप नेतृत्त्वाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपला फडणवीसांच्याच नेतृत्त्वात दणदणीत विजय मिळाला. पक्षानं सलग तिसऱ्यांदा १०० चा आकडा विधानसभेत ओलांडला.
Shiv Sena vs NCP: …तर आमच्या १०० जागा आल्या असत्या! शिवसेनेनं डिवचलं; जुलाबराव होऊ नका! NCPकडून प्रत्युत्तर
२०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले फडणवीस २०१९ मध्येही मुख्यमंत्री होतील, अशी परिस्थिती होती. जनादेश तसाच होता. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आघाडीसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. त्या काळात फडणवीस विरोधी पक्षनेते होते. २०२२ शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. भाजपशी हातमिळवणी करत शिंदे मुख्यमंत्री झाले. फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. तेव्हा भाजपच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.