Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गृहखात्यासाठी मोर्चेबांधणी; शिवसेनेची अपेक्षा, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार

5

Maharashtra Govt Formation: महायुतीमध्ये खातेवाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. घटक पक्षांना नेमकी किती खाती मिळणार, यावर खल सुरू आहे. यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृहखात्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली असून नैसर्गिक न्यायाने हे खाते मिळण्याची अपेक्षा पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स
shinde fadnvis pawar

मुंबई : ‘राज्य सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील त्याला माझा व शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे,’ असा पुनरुच्चार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. मात्र महायुतीमध्ये खातेवाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. घटक पक्षांना नेमकी किती खाती मिळणार, यावर खल सुरू आहे. यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृहखात्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली असून नैसर्गिक न्यायाने हे खाते मिळण्याची अपेक्षा पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर गेल्या आठवडाभर मुख्यमंत्रिपदावरून खल सुरू होता, मात्र आता मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला आहे. तूर्तास खातेवाटपावरून चर्चा सुरू असल्याचे कळते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीतही खातेवाटपाबाबत चर्चा झाली होती, मात्र त्याला अंतिम स्वरूप आलेले नाही. त्यात शुक्रवारी शिंदे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या दरे या गावी निघून गेल्याने महायुतीच्या बैठका लांबल्या. मात्र ते रविवारी ठाण्यात परतले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने गृहमंत्रिपदाची मागणी कायम ठेवल्याचे संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरून समोर आले आहे. ‘आम्ही गृहखात्याची मागणी केलेली आहे. नैसर्गिक न्यायाने आम्हाला हे खाते मिळायलाच हवे. ते गरजेचेच आहे,’ असे शिरसाट यांनी ठामपणे सांगितले.

‘एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याची शक्यता आहे. खातेवाटपाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू असली, तरी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम शिंदे करतील,’ असा विश्वासही शिरसाट यांनी व्यक्त केला. ‘आम्ही मागणी केली आणि त्यांनी लगेच खाते दिले, असे होत नाही. त्यासाठी (पान ८वर)

‘राज्य सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील त्याला माझा व शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे,’ असा पुनरुच्चार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. मात्र महायुतीमध्ये खातेवाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. घटक पक्षांना नेमकी किती खाती मिळणार, यावर खल सुरू आहे. यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृहखात्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली असून नैसर्गिक न्यायाने हे खाते मिळण्याची अपेक्षा पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
फडणवीसच मुख्यमंत्री? भाजप पक्षश्रेष्ठींकडून नावावर शिक्कामोर्तब, अखेर अनिश्चितता दूर
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर गेल्या आठवडाभर मुख्यमंत्रिपदावरून खल सुरू होता, मात्र आता मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला आहे. तूर्तास खातेवाटपावरून चर्चा सुरू असल्याचे कळते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीतही खातेवाटपाबाबत चर्चा झाली होती, मात्र त्याला अंतिम स्वरूप आलेले नाही. त्यात शुक्रवारी शिंदे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्या दरे या गावी निघून गेल्याने महायुतीच्या बैठका लांबल्या. मात्र ते रविवारी ठाण्यात परतले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने गृहमंत्रिपदाची मागणी कायम ठेवल्याचे संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरून समोर आले आहे. ‘आम्ही गृहखात्याची मागणी केलेली आहे. नैसर्गिक न्यायाने आम्हाला हे खाते मिळायलाच हवे. ते गरजेचेच आहे,’ असे शिरसाट यांनी ठामपणे सांगितले.
तुम्हाला निलंबित का करु नये? बंटी शेळकेंना कॉंग्रेसची नोटीस, नाना पटोले यांच्यावरील टीका भोवली
‘एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याची शक्यता आहे. खातेवाटपाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू असली, तरी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम शिंदे करतील,’ असा विश्वासही शिरसाट यांनी व्यक्त केला. ‘आम्ही मागणी केली आणि त्यांनी लगेच खाते दिले, असे होत नाही. त्यासाठी बैठक, चर्चा व्हावी लागते,’ असेही ते म्हणाले. ‘जनतेच्या मनातील सरकार स्थापन करणार’ सातारा : ‘कल्याणकारी योजना राबविण्यात हे सरकार यशस्वी झाल्यामुळे नागरिकांच्या मनातील सरकार स्थापन करण्यात येणार आहे,’ असे एकनाथ शिंदे यांनी रविवारी अधोरेखित केले आहे. दरे येथून मुंबईला रवाना होण्यापूर्वी ते स्थानिक पत्रकारांशी बोलत होते.
Sanjay Shirsat: गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम सांभाळू! संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चेला उधाण
‘मी सामान्य लोकांच्या अडचणी, त्यांची दुःखे समजून घेऊन काम केले आहे. सहाजिक त्यांच्या त्याच पद्धतीच्या भावना आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून ते माझ्याकडे पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले हे यश हे सर्वाधिक आहे. यामध्ये कोणाचाही संभ्रम नको,’ असेही ते म्हणाले.

गृहखात्यापासून शिवसेना कायम लांबच
राज्यात १९९५मध्ये शिवसेना, भाजप युतीचे सरकार आले, तेव्हा त्यात मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे होते. तर उपमुख्यमंत्रिपद भाजपकडे होते. त्यावेळी गृहमंत्री भाजपचे गोपीनाथ मुंडे होते. २०१४ ते १०१९ या कालावधीत राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. फडणवीस स्वतःच मुख्यमंत्री होते. या सरकारमध्ये शिवसेना होती. मात्र त्यावेळेही लहान भाऊ असलेल्या शिवसेनेला गृहमंत्रिपद देण्यात आले नव्हते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.