Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ajit Pawar Big Banner Displayed at Nagphani: मावळ विधानसभा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदु ठरला होता. सर्व पक्ष विरोधात असूनही अजित पवार यांचे शिलेदार असलेले सुनील शेळके यांनी लाखांच्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकली. यातच महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रत्येक पक्षाकडून ताकद लावली जात आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळमधील तरुणांनी ८०० फूटावरुन मोठा बॅनर झळकावला आहे.
यंदाच्या निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, यावर राज्यभर रंगली आहे. दरम्यान अजितदादाच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात होतच आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याचा मोठा दावा भाजप नेत्याने केला आहे. पण अजित पवार पवारांच्या समर्थकांच्या मनातील इच्छाही आता बळावली आहे. तर दुसरीकडे जायंट किलर ठरलेल्या सुनील शेळकेेंना देखील मंत्रीमंडळात स्थान मिळावे, अशी देखील इच्छा व्यक्त होत आहे.
Amit Shah : मंत्रिपद हवंय? अमित शाहांची बारीक चाळणी, एकापेक्षा एक आठ निकष; सातवा मुद्दा महायुतीसाठी कळीचा
नागफणी कडा हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा, चढाईला अतिशय दुर्गम व कठीण आहे. असा हा कठीण असलेला ड्युक्स नोज उर्फ नागफणी कडा. गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साह्याशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड मानली जाते. परंतु हा अवघड सुळका सर करून विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान मिळावे हे ध्येय उराशी बाळगून जिद्द आणि धाडसाच्या जोरावर या युवा गिर्यारोहकांनी नागफणी सुळक्यावर बॅनर झळकावला आहे. या मोहिमेत मावळातील नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, विशाल गोपाळे, अजित गोपाळे व पांडुरंग जाचक यांनी सहभाग घेतला होता.
आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत गिर्यारोहकांना खुणावणारे अनेक सुळके आपण पाहतो. या अवघड सुळक्यांवर गिर्यारोहक निसर्गाशी सामना करीत यशस्वीरीत्या चढाई करतात. अशाच सुमारे ८०० फूट उंचीच्या नागफणी सुळक्यावर मावळातील तरुणांनी यशस्वीरित्या चढाई करून वाऱ्याच्या वेगाचा सामना करीत अजित दादा आणि सुनील शेळकेंचा ३० फुटी मोठा बॅनर झळकावला आहे.