Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ratnagiri Dumper Bike Accident : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोळंबे इथे एका डंपरने रस्त्याच्या बाहेर उभा असलेल्या बाईला धडक दिली. यात डंपरचं चाक दुचाकी चालकाच्या डोक्यावरुन जात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुजीब सोलकर हे कोळंबे येथे रस्त्याच्या बाहेर दुचाकी उभी करुन बोलत होते. याच दरम्यान संगमेश्वरच्या दिशेने जाणार्या डंपर चालकाने सोलकर यांना रस्त्याबाहेर उभ्या असलेल्या मुजीब यांना उडवलं. इतकंच नाही, तर व्यक्तीला उडवल्यानंतर चालकाने न थांबताच डंपर भरधाव वेगाने संगमेश्वरच्या दिशेने नेला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
Crime News : गोणीत बॉडी, कपाळावर टिका… तीन दिवसांपासून बेपत्ता मुलासोबत काय घडलं? पोलिसांना वेगळाच संशय
या संपूर्ण अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली होती. डंपर पकडून ठेवण्यात आला आहे. या सगळ्या घटनेची माहिती मिळतात संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेतील डंपर चालक फरार झाला होता. निधन झालेले मुजीब सोलकर हे रत्नागिरी कुरधुंडा, मुस्लीम मोहल्ला येथील आहेत. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा डंपर म्हात्रे कंपनीचा असल्याचं बोललं जात आहे. तर संगमेश्वर पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.
Solapur News : पुण्यातील कुख्यात गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी, माझा बाबा सिद्दिकी होण्याआधी…. माजी आमदाराची पोलिसांकडे मागणी
अपघात महामार्गावर संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. सोलकर हे रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या बाहेर थांबले होते. त्याच्या मागून येणाऱ्या भरधाव डंपरने मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत डंपरचं चाक मोटरसायकल चालकाच्या डोक्यावरून गेलं आणि यातच मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. डंपरच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला संगमेश्वर पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
रस्त्याच्या कडेला बाईक उभी करुन बोलत होते, भरधाव डंपर आला आणि अनर्थ घडला; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणचे पोलीस उपनिरीक्षक अनंत पवार सहाय्यक उपनिरीक्षक विष्णू गिमवणेकर आदींनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत अपघातातील वाहन मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. या अपघातात मृत्यू झालेल्या सोलकर यांचा मृतदेह संगमेश्वर पोलिसांच्या मदतीने ॲम्बुलन्समधून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे.