Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nitin Gadkari News: नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणावर मोठे भाष्य केले. लोकांच्या महत्वकांक्षा इतक्या मोठ्या झाल्या आहेत की त्यामुळे जीवनातील आनंद हरवल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित 50 गोल्डन रूल ऑफ लाईफ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आले होते त्यावेळी त्यांनी राजकारणातील असंतोषावर मार्मिक भाष्य केले. त्यांनी सांगितले की, राजकारण एक असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे आणि इथे कुणीही समाधानी नाही. गडकरी यांच्या मते, प्रत्येकाच्या महत्वकांक्षा इतक्या मोठ्या झाल्या आहेत की त्यामुळे जीवनातील आनंद हरवला आहे. त्यांनी यासाठी राजकारण तसेच कार्पोरेट क्षेत्राचं उदाहरण दिलं आणि सांगितलं की, इथे प्रत्येक व्यक्ती असंतुष्ट आहे.Historic Move: युक्रेनमध्ये होणार आणखी विध्वंस; पुतिन यांच्या निर्णयाने जगाचे टेन्शन पुन्हा वाढले, रशियाच्या लष्कराला…
गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाला काही ना काही असंतोष असतो. उदाहरणार्थ, जो नगरसेवक बनला आहे, तो आमदार होण्याच्या महत्त्वाकांक्षेने दुःखी असतो. जो आमदार झाला आहे, तो मंत्री होण्याची इच्छा असतो, आणि जो मंत्री बनला आहे, त्याला मनासारखं खाते न मिळाल्याचं दुःख असतं. जो मुख्यमंत्री झाला आहे, त्याला पक्षाच्या उच्चपदाधिकारींनी केव्हा पदावरून बाजूला करायचं याची भीती असते. या सर्वांची एकच गोष्ट समान आहे – असंतोष. त्यावर त्यांनी एक मार्ग सुचवला आणि तो म्हणजे ‘आर्ट ऑफ लिविंग’चा अवलंब करणं. गडकरी यांच्या मते, ‘आर्ट ऑफ लिविंग’ म्हणजे जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत ताळमेळ राखणे आणि आत्मशांती प्राप्त करणे.
एडिलेड कसोटीच्या आधी भारताला मिळाली गुड न्यूज; WTC फायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण झाले आणखी सोपे
गडकरी यांच्या या वक्तव्यातील थोडक्यात अर्थ हा आहे की, राजकारण आणि कार्पोरेट क्षेत्रातील महत्वाकांक्षांनी व्यक्तीला कधीच पूर्णत्वाकडे न नेता, त्या व्यक्तीला सतत असंतुष्ट ठेवले आहे. राजकारणात असे असंतोष कसे शमवता येईल, हे ही त्यांनी विचारले. गडकरी यांचे म्हणणे आहे की, जर लोक आत्मशांती साधू शकले, तर त्यांना त्यांच्या जीवनातील खऱ्या आनंदाचा अनुभव होईल. ‘आर्ट ऑफ लिविंग’ ही पद्धत जीवनातील मानसिक शांती आणि संतुलन साधण्यास मदत करते, हे त्यांनी यावेळी सांगितलं.
गडकरी यांचा हा विचार राज्यातील राजकारणाच्या संदर्भात महत्त्वाचा ठरतो. आजकालच्या राजकारणात जो असंतोष आणि संघर्ष असतो, तो फक्त वयस्क आणि वरिष्ठ नेत्यांपुरता नाही, तर प्रत्येक पातळीवरील राजकारणीसुद्धा याचा भाग असतो. त्यांच्या या विचारांनी राजकारणी वर्गासाठी एक आरसा उभा केला आहे.