Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vaibhav Naik Got Emotional : माजी आमदार वैभव नाईक भर सभेत भावूक झाल्याचं दिसलं. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी आपला पराभव मान्य करत मला आता आमदार म्हणून नका असं सांगितलं.
Vaibhav Naik : फेर मतमोजणीची मागणी करणार नाही, झालेला पराभव मला मान्य; वैभव नाईकांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर

शिवसेना आणि संघर्ष हा काही नवीन नाही, मात्र या चिंतन बैठकीनंतर आपण सर्वांनी पक्षासाठी जोमाने काम करण्याची आवश्यकता आहे.
चिंतक बैठक नव्हे, तर नव्याने कामाला सुरुवात करण्याची ही वेळ आहे. निवडणुकीच्या काळामध्ये विरोधकांच्या आरोपांना गुंडशाहीला आपण भिडलात. आपला पराभव हा थोडक्यात झाला, असला तरी आपण लढाई करून झालेला आहे. जीवनामध्ये वाटचाल करत असताना संघर्ष हा असतोच. आपले अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये किंवा मोलमजुरी करतायत, म्हणून पुन्हा या प्रवाहामध्ये पडलं पाहिजे.

खरंतर ज्या दिवशी माझा पराभव झाला तो लोकांकडून मी स्वीकारला, मात्र फेर मतमोजणीसाठी अनेक आमदारांनी पैसे भरले, पण मी एकही रुपया भरलेला नाही. अनेकांनी अपील देखील केलं आहे. जो पराभव आपला झाला आहे तो आपण मान्य केला पाहिजे. झालेल्या पराभवावर आपल्याला बोलायचं नाही, तर पुढे नव्याने जोमाने काम करायचं आहे, असं ते म्हणाले.
आमदार असताना मी गेल्या दहा वर्षात सर्व सामान्य माणसासाठी काम केली. मी आता आमदार नाही त्यामुळे मला आमदार न म्हणता मला माझ्या नावाने हाक मारा. मला आमदार म्हणू नका, साहेब म्हणा, वैभव नाईक म्हणा किंवा वैभव म्हणा, जेव्हा आपण पुन्हा निवडून येऊ तेव्हा मला आमदार म्हणा, अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली. आपण काही आयुष्यभर हा टिळा लावून आलो नाही की हे पद आपल्याला कायमचं मिळावं. मात्र या काळामध्ये आपल्यासोबत काही लोक असतील, तर आपल्याला काही लोक सोडतील, जे लोक आपल्या सोबत असतील त्यांना घेऊन आपण काम जोमाने करायचा आहे. आपण सर्वजण एका विचाराने एकत्र आलो आहेत.देवेंद्र फडणवीसांनी तर कमालच केली! स्वत:च्या दोन PA ना आमदार केले, हा ट्रेंड काय सांगतोय?
नवनिर्वाचित आमदारांनी मतदारसंघातील विकास कामे करावीत, राज्य शासनाने लाडक्या बहिणीला देऊ केलेले २१०० रुपये बंद केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरु. ७३ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मतदारसंघात मी काम करत राहणार आहे. माझ्या विरोधात निवडून आलेल्या उमेदवाराला मी तेव्हाच शुभेच्छा दिल्या. आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे. त्यांनी विकास कामे करून दाखवावीत. हे करत असताना सत्ताधारी आणि अधिकारी यांनी एक लक्षात ठेवावे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून कामे केल्यास आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास त्याला आमचा विरोध राहील. हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, प्रसंगी रस्त्यावर उतरण्यास आम्ही कमी पडणार नाही. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे. संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवट्पर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचं वैभव नाईक म्हणाले.
Vaibhav Naik : फेर मतमोजणीची मागणी करणार नाही, झालेला पराभव मला मान्य; वैभव नाईकांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर
‘माझ्याबरोबर काही लोक शेवटपर्यंत थांबतील तर काही लोक साथ सोडतील, मात्र शेवटचा नागरिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करण्याचा निश्चय मी केला आहे. विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा विषय घेण्यात आला. मात्र पंधरा वर्षे भाजपची सत्ता आहे, तरीही हिंदू खतरे में है अशी भूमिका घेऊन ते लोकांची फसवणूक करत आहेत. मात्र ही भूमिका जास्त काळ टिकणार नाही.’
उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात काम करायचे आहे. सत्ताधारी ज्या ज्या वेळी चुकतील त्या त्या वेळी आपण आवाज उठवला पाहिजे. लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. आता विकास कामांची जबाबदारी आपल्यावर नसली, तरी लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी शिवसैनिकांची साथ येणाऱ्या काळात मला लागणार आहे आणि सर्व शिवसैनिक मला साथ देतील असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला. काम करताना कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक भावूक झाले होते.