Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मी….; नवीन मुख्यमंत्री शपथविधीसाठी लगबग सुरू, फडणवीस, शिंदेंच्या भेटीसाठी रीघ

16

Maharashtra New CM Oth Ceremony : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व संकटमोचक मानले जाणारे भाजप नेते गिरीश महाजन हे सोमवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले.

हायलाइट्स:

  • मी….शपथ घेतो की
  • नवीन मुख्यमंत्री शपथविधीसाठी लगबग सुरू
  • फडणवीस, शिंदेंच्या भेटीसाठी रीघ
महाराष्ट्र टाइम्स
महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथविधी

मुंबई : मुख्यमंत्रिपदाबाबत अस्पष्टता असली तरी महायुतीच्या ५ डिसेंबरच्या शपथविधीसाठी लगबग सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या सरकारी बंगल्यावर सोमवारी भाजप नेत्यांची रीघ लागली होती. दुसरीकडे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार पंकजा मुंडे आदींनी सोमवारी ‘सागर’ बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी (शप) पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनीही ‘सागर’वर जाऊन फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व संकटमोचक मानले जाणारे भाजप नेते गिरीश महाजन हे सोमवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. ‘एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो. महायुतीत सर्वकाही आलबेल आहे, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, ’ असे महाजन यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. शपथविधीला आम्ही एकत्रित दिसू, असेही महाजन म्हणाले. दरम्यान, शिंदे यांच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने सोमवारच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. त्यांच्या भेटीसाठी शिवसेना नेत्यांची रिघ लागली होती.
Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला गळती? दोन नेते अजित दादांना भेटले; दोघेही राष्ट्रवादीत जाणार?

दरम्यान, भाजपच्या नेतृत्त्वानं महाराष्ट्रासाठी निरीक्षक म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निवड केलेली आहे. विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे पंजाबचादेखील प्रभार आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं आंदोलन पेटलेलं असताना रुपाणी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद होतं. २०१६ ते २०२१ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्रिद भूषवलं.

विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन उद्या रात्री मुंबईत दाखल होतील. त्यानंतर गुरुवारी म्हणजेच ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता भाजपच्या आमदारांची बैठक होईल. त्या बैठकीत विधिमंडळ गटनेता ठरवण्यात येईल. आमदारांशी संवाद साधून रुपाणी आणि सीतारामन त्यांच्याकडून सुचवण्यात आलेल्या नावांवर सहमती घेतील. विधिमंडळ गटनेत्याचं नाव निश्चित झाल्यानंतर ते निरीक्षकांकडून दिल्लीला कळवण्यात येईल.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.