Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शेतकऱ्यासाठी राबलेल्या ‘धर्मराज’चं निधन; परिवारासह अख्खं गाव हळहळलं

5

Nandurbar Ambapur Death of Dharmaraj Bull: शहादा तालुक्यातील अंबापूर हे एक छोटसं गाव आहे. या गावातील शेतकरी मोतीराम देवराम जगदाळे हे शेती करून घराचा उदरनिर्वाह करत होते. १५ वर्षांपूर्वी वाट चुकून अचानक एक वासरू त्यांच्या घरी आले.

हायलाइट्स:

  • मोकाट वासराला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलं
  • शेतकऱ्यासाठी राबलेल्या ‘धर्मराज’चं निधन
  • परिवारासह अख्खं गाव हळहळलं
Lipi
नंदुरबार अंबापूर धर्मराज बैलाचं निधन

महेश पाटील, नंदुरबार : १५ वर्षांपूर्वी वाट चुकून आलेल्या वासराला शहादा तालुक्यातील अंबापूर येथील मोतीराम देवराम जगदाळे यांच्या कुटुंबाने या वासराला पोटाच्या पोराप्रमाणे वाढवले. तो देखील कुटुंबातील सदस्यप्रमाणे राबला. दरम्यान, या वासराचं नाव त्यांनी धर्मराज ठेवलं आणि याच धर्मराजचे आता निधन झालं आहे. देवराम जगदाळे या शेतकऱ्याने मनुष्याच्या मृत्यूनंतर असलेल्या सर्व विधी धर्मराज या बैलाच्या मृत्यूनंतर केल्या. अंत्यविधीला नातेवाईक आणि गावकरी जमले होते. त्यानंतर या शेतकऱ्याने उत्तरकार्याला ६०० जणांना जेवू घातले. आयुष्यभर कुटूंबासाठी काळ्या मातीत राबणाऱ्या सर्जाचे ऋण अदा करण्यासाठी बळीराजाने घडविलेल्या माणूसकीच्या दर्शनाची जिल्ह्यात चर्चा आहे.शहादा तालुक्यातील अंबापूर हे एक छोटसं गाव आहे. या गावातील शेतकरी मोतीराम देवराम जगदाळे हे शेती करून घराचा उदरनिर्वाह करत होते. १५ वर्षांपूर्वी वाट चुकून अचानक एक वासरू त्यांच्या घरी आले. त्यांनी परिसरात तपास केला मात्र तपास लागला नाही. त्यामुळे त्यांनी त्या वासराला आपल्याजवळ ठेवले. ते वासरू कुटुंबातील एक सदस्यच बनला. त्याचे नाव त्यांनी धर्मराज असं ठेवलं. कुटुंबातील सदस्यप्रमाणे त्याच्यावर सर्व कुटुंबीयांचा जीव जडला. धर्मराज जसजसा मोठा होत होता. तसतसा कुटुंब आणि त्याच्यातील स्नेह वाढत होते.
Eknath Shinde: एकनाथ शिंदे दिलदार नेते, त्यांचा मान राखावा, सेनेच्या नेत्याची मागणी, महायुतीतील तिढा सुटणार?

जगदाळे कुटुंबासाठी धर्मराज भाग्यवान ठरला. घरातील व्यक्ती त्याच्याजवळ आल्यास तो हंबरडा फोडत असे तर बाहेरची व्यक्ती अथवा मोकाट कुत्रे आल्यावर तो सैरभैर होत असे. त्यामुळे जगदाळे कुटुंबातील या धर्मराजाची गावासह परिसरात तसेच नागरिकांमध्ये चर्चा होती. घरातील सदस्य प्रमाणेच धर्मराज हा बैल राबराब राबत होता. त्याचेच फळ म्हणून जगदाळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. असं असताना २७ नोव्हेंबर रोजी अचानक धर्मराजचा मृत्यू झाला. धर्मराजच्या अचानक एक्झिटनंतर अख्खं कुटुंब दुःखात बुडाले आणि कुटुंबासह संपूर्ण गाव हळहळले. आयुष्यभर राबणाऱ्या धर्मराज याला अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईक गावकरी अंत्ययात्रेला आले.

धर्मराजची अंत्ययात्रा आणि उत्तरकार्य

जगदाळे कुटुंबावर २७ नोव्हेंबर रोजी दुःख कोसळले. आयुष्यभर पोटाच्या पोराप्रमाणे सांभाळ केलेल्या धर्मराज या बैलाचे निधन झाले. गावकरी आणि नातेवाईक धर्मराजाच्या अंत्ययात्रेसाठी एकत्र आले. अंबापूरच्या जगदाळे कुटूंबियांच्या मनाला चटका लावणाऱ्या घटनेनंतर ‘धर्मराज’ची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी माणसावर ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येतात, तशाच पद्धतीने वाजा लावून, नवे कपडे घालून सर्व विधी पार पाडल्या. शेकडो नातेवाईक आणि गावकरी आले. त्यांनी धर्मराजला अखेरचा निरोप दिला. त्यानंतर कुटुंबियांनी नातेवाईकांना कै. धर्मराज मोतीराम जगदाळे याचे निधन झाल्याचा मेसेज टाकून उत्तर कार्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. पिंडदान, दशक्रिया आदी. विधी करत १ डिसेंबर रोजी उत्तरकार्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिक तसेच नातेवाईक असे ६०० लोकांना जगदाळे कुटुंबियांनी जेवण खाऊ घातले. आयुष्यभर कुटुंबासाठी राबणाऱ्या सर्जाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या बळीराजाने घडविलेल्या माणूसकीच्या कुटुंबीयांची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.