Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sanjay Raut Slams BJP: भाजप काय आहे हे आता शिंदेंना कळेल. तेव्हा त्यांना मूळ शिवसेना तोडायची होती म्हणून त्यांनी गोंजारलं, पण आता भाजपकडून अजित पवार आणि शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हायलाइट्स:
- शिवसेना तोडायची होती म्हणून त्यांना गोंजारलं
- आता त्यांना कळेल भाजप काय आहे ते
- संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
एकनाथ शिंदे गटाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुळात ती खरी शिवसेना नसल्याने त्यांना ही अपमान सहन करावा लागत आहे, पुढेही सहन करावा लागेल. अडीच-तीन वर्षांपूर्वी भाजप त्यांना गोंजारत होते, ते यासाठी कारण त्यांना आमची मूळ शिवसेना तोडायची होती. महाराष्ट्र कमजोर करायचा होता.
आता त्यांना कळेल भाजप काय आहे, भाजपचं अंतरंग काय आहे आणि बाह्यस्वरुप काय आहे. मुळात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुफान भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला.
ते दोघे एकत्र निवडणुका लढले, काल अजित पावर दिल्लीत होते, रात्रभर दिल्लीत फिरत होते. भेटीगाठी घेत होते. सरकार महाराष्ट्राचं आणि अनेक नेते दिल्लीत, असं चित्र आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाहीये, असं म्हणत राऊतांनी महायुतीला टोला लगावला आहे.
अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो फार मोठा विनोद असणार आहे. पण, हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवून येत आहे.
कारण ज्यांनी मतदान केलं, त्यांचा आपण केलेल्या मतदानावर निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही. गावागावात फेरमतदान घेत आहे, यावर निवडणूक आयोगाने भाष्य केलं पाहिजे.
Sanjay Raut: आता कळेल भाजप काय आहे! अजितदादा-शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा घणाघात
मारकडवाडीत १४४ कलम लावलं, लोकशाही पद्धतीने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवर १४४ कलम लावून त्यांना घरातून ठांबून ठेवलं जात आहे अशा धमक्या दिल्या जातात. त्या मतदासंघात भाजपचा पराभव झाला आहे, पण लोकांच्या मते विजयी उमेदवाराला मिळालेली मतं कमी आहे, असंही संजय राऊत म्हणाले.