Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यात उद्रेक होईल; माजी आमदाराने दिला इशारा, मतदारसंघात मारकडवाडी पॅटर्न राबवण्याची घोषणा

6

Solapur News : मारकडवाडी गावातील ग्रामस्थांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो, मी देखील मारकडवाडी पॅटर्न राबवणार असल्याचं वक्तव्य माजी मंत्र्यांनी केलं आहे. चंद्रावर गेलेल्या यानाला जमिनीवरुन रिमोटद्वारे नियंत्रित केलं जातं, तर ईव्हीएम मशीन काय चीज आहे, असं म्हणत त्यांनी EVM हटवण्याचं म्हटलं आहे.

Lipi

इरफान शेख, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गाव राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या प्रयोगाला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी मारकडवाडी ग्रामस्थांचा अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. मारकडवाडी पॅटर्न राज्यात आणि देशात राबवण्यात यावा अशी मागणी सिद्धराम म्हेत्रे यांनी केली आहे. प्रशासनाने त्यांचा हा प्रयोग का हाणून पाडला.? मारकडवाडी ग्रामस्थांना रोखण्यात आलं हे दुर्दैव आहे. दूध का दूध पानी का पाणी होऊ द्यायला पाहिजे होतं आणि मारकडवाडी गावातील ग्रामस्थांच्या या प्रयोगामुळे राज्यातील यांची सत्ता गेली असती का? असे सवाल सिद्धराम म्हेत्रे यांनी उपस्थित केले आहेत.
भरधाव ट्रकने ट्रॅक्टर – दुचाकीला उडवलं आणि धूम ठोकली, नागरिकांनी १५ किमीवर फिल्मी स्टाईलने पकडलं

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मारकडवाडी पॅटर्न राबवणार

काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ४९ हजार ५७२ मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार सिद्धराम म्हेत्रे यांना ९८ हजार ५३३ मतं मिळाली आहेत. भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांना १ लाख ४८ हजार १०५ मतं मिळाली आहेत.
Vaibhav Naik : फेर मतमोजणीची मागणी करणार नाही, झालेला पराभव मला मान्य; वैभव नाईकांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर
सिद्धराम म्हेत्रे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे, की मला देखील ईव्हीएम मशीनवर संशय आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील एका गावातील एका बुथवर काँग्रेसला फक्त एक मतदान आहे. हे शक्य नाही. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध गावात मारकडवाडी पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची माहिती सिद्धराम म्हेत्रे यांनी दिली आहे.
नामांकन अर्जासाठी १० हजार डिपॉझिट, फेर मतमोजणीसाठी १० लाख, हा कुठला न्याय? शरद पवारांच्या शिलेदाराचा सवाल

राज्यात उद्रेक होईल; माजी आमदाराने दिला इशारा, मतदारसंघात मारकडवाडी पॅटर्न राबवण्याची घोषणा

चंद्रावरील यानाला जमिनीवर बसून नियंत्रित केलं जातं, मग त्यासमोर ईव्हीएम काय?

काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी चंद्रावरील यानाचं उदाहरण दिलं. चंद्रावर गेलेल्या यानाला जमिनीवर बसून रिमोटद्वारे नियंत्रित केलं जातं, तर ईव्हीएमला हॅक करता येऊ शकत नाही का? हे सर्व गौडबंगाल आहे. ईव्हीएम हटवले पाहिजे, अन्यथा देशात बांग्लादेश किंवा श्रीलंका सारखी परिस्थिती निर्माण होईल. जनतेच्या उद्रेकाला सामोरं जावं, लागेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी दिली आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.