Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बाळासाहेब थोरात कडाडले, पराभवानंतर पहिल्यांदाच बोलले; ज्यांनी कोणी विष पेरण्याचा प्रयत्न केला, त्यांचा…
Balasaheb Thorat : एका पराभवाने खचून जाणार नाही, तालुक्यात येऊन ज्यांनी विष पेरण्याचा प्रयत्न केला, त्यांचा खल्ला परतवून लावू, असं म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं आहे.

त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव घेता निशाणाही साधला. आता सत्यजित तांबे आपला आमदार आहे, त्याच्या माध्यमातून कामे मार्गी लावू असेही सांगत तांबे पुन्हा सोबत असल्याचे संकेतही थोरात यांनी दिली. यावेळी आमदार सत्यजित तांबेही उपस्थित होते. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील पराभावाच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी आज स्नेहसंवाद मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, हिरालाल पगडाल, डॉ जयश्री थोरात, वसीमभाई यावेळी उपस्थित होते.

थोरातांनी सांगितली पुढील दिशा –
थोरात यांनी आपल्या पराभवाची कारणे सांगताना पुढील वाटचालीची दिशाही सांगितली. थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होणार आहे. हिंदू मुस्लिम द्वेष पसरून काहींनी राजकारण केले. मीही हिंदू आहे पण सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. मोठ्या कष्टातून तालुका उभा केला. दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका असा लौकिक देशात पोहोचवला. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला.
तालुक्यातील गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राजकारण केले. कधीही कोणाला त्रास दिला नाही. कधी चुकीचा शब्द बोललो नाही. कुणाचे मन दुखवले नाही. निवडणूक संपली की राजकारण संपले अशी आपली पद्धत आहे. हीच परंपरा आपल्याला जपायची आहे. आपला सहकार चांगला आहे. बाजारपेठ चांगली आहे. शेती समृद्ध झाली आहे. बायपास, हॅपी हायवेसह बसस्थानक, शहरातील भव्यदिव्य इमारती आणि निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन असे अनेक मोठमोठे प्रकल्प आपण राबवले आहे. काम केले त्याबद्दलची कृतज्ञता सर्वांनी ठेवली पाहिजे.Vaibhav Naik : फेर मतमोजणीची मागणी करणार नाही, झालेला पराभव मला मान्य; वैभव नाईकांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर
विरोधकांनी बदनामीचं षडयंत्र रचलं –
१९८५ पूर्वी संगमनेर हे दंगलीचे शहर म्हणून ओळखले जायचे. परंतु ४० वर्ष सर्व समाजामध्ये आपण बंधूभाव निर्माण केला. एक आदर्श वातावरण तयार केले. मी ही हिंदू आहे. परंतु इतरांचा कधीही द्वेष केला नाही. मानवता हा धर्म पाळून काम करत आहोत. मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अनेक तीर्थस्थळ उभे केली आहेत. परंतु विरोधकांनी काही खोट्या एजन्सी तयार करून खोटे व्हिडिओ टाकून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले, असा आरोपही थोरात यांनी केला.
बाळासाहेब थोरात कडाडले, पराभवानंतर पहिल्यांदाच बोलले; ज्यांनी कोणी विष पेरण्याचा प्रयत्न केला, त्यांचा…
शिर्डी मतदारसंघात लक्ष घातलं कारण?
आपण शिर्डी मतदारसंघात यावेळी जास्त लक्ष का घातले याबद्दल सांगताना थोरात म्हणाले, सत्तेचा गैरवापर करून तालुक्यातील आपल्या अनेक कार्यकर्त्यांवर त्यांनी खोट्या केसेस टाकल्या. हे सर्व थांबवण्यासाठी आपण शिर्डी मतदारसंघात जाऊन लढा दिला. यापुढेही आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन लढायचे आहे असे थोरात म्हणाले. यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले, थोरात यांनी राजकारणातील पावित्र्य जपले. कधीही तत्त्वांची तडजोड केली नाही, मात्र जातीय तणाव निर्माण करून द्वेष भावना पसरून घाणेरडे राजकारण करणाऱ्या मंडळींनी संस्कृत नेतृत्वाचा पराभव नव्हे तर घात केला आहे.