Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Raj Thackeray Criticize Ruling Party: विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महायुती वगळता सर्वच राजकीय पक्षांकडून निकालावर आक्षेप घेतले आहेत. यातच आता मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही निकालावरुन सत्ताधाऱ्यांना मनसे स्टाईल टोला लगावला आहे. क्रिकेट जगताशी तुलना करत राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.
क्रिकेटचे गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी पार्क मैदानात आचरेकर यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. पार्कातील गेट क्रमांक ५ जवळ हे स्मारक उभारण्यात आले आहे. आचरेकर सरांचे आवडते शिष्य सचिन तेंडुलकरच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला राज ठाकरेंचीही प्रमुख उपस्थिती होती. किंबिहुना हे स्मारक उभारण्याची संकल्पनाही राज ठाकरेंची होती. क्रिकेटचं दर्शन घडवणारं हे एक अनोखं स्मारक ठरणार आहे. ज्यामध्ये विशेषत: दिग्गज क्रिकेटरची स्वाक्षरी असलेली बैट, स्टम्प्स, ग्लोव्हज आणि आचरेकर सरांची ओळख असलेली त्यांची रोमिओ हैट बसवण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरेंनी क्रिकेट सोबतच राजकीय विषयांवरही भाष्य केले आहे.
‘महायुतीत स्ट्राईक रेटनुसार आम्ही दोन नंबरवर,’ शिवसेनेच्या तीन नंबरची आठवण करुन देत भुजबळांची मोठी मागणी
गेल्या निवडणुकीच्या वेळी आम्हाला क्रिकेटप्रमाणेच थर्ड अंपायर मिळाला असता तर कदाचित अनेक निकाल बदलले असते, मात्र आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्ही देखील काही करू शकलो नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासोबतच राज्यकर्त्यांनाही चिमटे काढले आहेत. यासोबतच त्यांनी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत लोकांचा योग्य सन्मान राखण्याबद्दलही सरकाराल आठवण करुन दिली आहे. ते म्हणाले, ‘खरं पाहिलं तर हे स्मारक याआधीच उभारायला हवं होतं. कारण रमाकांत आचरेकर सर म्हटलं की, सचिन तेंडुलकर हे नाव समोर येतं. कारण मला वाटतं नाही की भारतात आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू तयार केले, तेवढे एखाद्या कोचने तयार केले असतील, असे मला वाटत नाही. पण आपल्या देशात, राज्यात फ्लायओवर, महामार्ग इत्यादी सारख्या अनेक गोष्टी तयार होत असताना त्यांना खऱ्या अर्थाने अशा लोकांची नावे दिली पाहिजेत.’
आचरेकर सरांचे योगदान एवढे मोठे आहे की त्यांच्या नावे एखादा स्मारक व्हावं, काहीतरी मोठं कार्य व्हावं, असं मला मनापासून वाटत होतं. त्यासाठी मी अनेक लोकांसोबत बोललो होतो. मात्र मला आचरेकर सरांचा पुतळा नको होता. आपल्याकडे पुतळे भरपूर झाले आहेत. त्यामुळे मी वेगळी कल्पकता वापरून स्मारका ऐवजी जिथे स्टम्प आहेत,ग्लोज आहे बॅट बॉल आहेत, यासह आचरेकर सरांची सरांची टोपी आहे. ती कॅप आचरेकर सरांची खास ओळख होती, त्याचे स्मारक केलं. असे ही राज ठाकरे म्हणाले.