Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भरधाव ट्रेलर पलटी झाला, महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; क्रेनने वाहनं बाजूला करत २१ जणांना वाचवलं
4 Vehicle Accident on Highway : एकाच वेळी चार वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. ट्रेलर पलटी झाल्यानंतर तो बस, कार आणि एका आयशरवर धडकला. या तब्बल २१ जण जखमी झाले.
राज्यात उद्रेक होईल; माजी आमदाराने दिला इशारा, मतदारसंघात मारकडवाडी पॅटर्न राबवण्याची घोषणा
चार वाहनांचा एकत्रित अपघात, १७ जण जखमी
या चार वाहनांच्या अपघातात कार मधील मनोज महादेव मांजरेकर आणि अन्य एक प्रवासी असे दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले. घरडा केमिकलच्या बसमधील एकूण १७ प्रवासी कर्मचारी जखमी झाले. या सगळ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील खेड लोटे पोलीस चौकीचे उपनिरीक्षक अनंत पवार, हेड कॉन्स्टेबल श्री शिंदे जाधव कदम या महामार्ग पोलिसांनी जखमींना मदत करून रुग्णालयाता पाठवलं नंतर वाहतूक सुरळित करण्यात आली.
भरधाव ट्रकने ट्रॅक्टर – दुचाकीला उडवलं आणि धूम ठोकली, नागरिकांनी १५ किमीवर फिल्मी स्टाईलने पकडलं
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई ते गोवा या मार्गावर घाटातील वळणावर ट्रेलर कंटेनर पलटी होऊन, आयशरवर तसंच चिपळूण ते घरडा केमिकल कंपनी अशा जाणाऱ्या बसवर जाऊन कोसळला. त्याचवेळी बसच्या पाठीमागून येणाऱ्या कारला देखील बसचा पाठीमागील भाग लागल्याने एकूण चार वाहनांचा विचित्र अपघात झाला.
बाळासाहेब थोरात कडाडले, पराभवानंतर पहिल्यांदाच बोलले; ज्यांनी कोणी विष पेरण्याचा प्रयत्न केला, त्यांचा…
भरधाव ट्रेलर पलटी झाला, महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; क्रेनने वाहनं बाजूला करत २१ जणांना वाचवलं
ट्रेलर चालक पळून गेला
ट्रेलर चालक अपघात घडताच पळून गेला. आयशरवरील चालक बसमधील घरडा केमिकल कंपनीचे कर्मचारी संकेत पांडुरंग जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खाजगी वाहनाने लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण येथे दाखल करण्यात आले. कारमधील जखमी आणि बसमधील जखमी यांना घरडा हॉस्पिटल लवेल या ठिकाणी ॲम्बुलन्सने पाठवण्यात आले आहे. रस्त्यावरील कंटेनर तसंच इतर अपघातातील वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक काही वेळात पूर्ववत करण्यात आली. या अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण लोटे येथील महामार्ग पोलीस करत आहेत.