Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘आग विझवा, नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच…’ सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले

3

Sushma Andhare commentted on Gulabrao Patil Statement: सत्तेत अपेक्षित स्थान मिळणार नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच ‘एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद तरी द्यायला पाहिजे,’ असे म्हणत गुलाबराव पाटलांनी एकप्रकारे शिंदेंच्या नाराजीची पुष्टी दिली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी बोचरी टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स

पुणे : विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर आता महायुती सत्तेत विराजमान होणार आहे. शपथविधीचे स्थळ आणि वेळही ठरली असून जय्यत तयारी देखील सुरु आहे. असे असले तरी अद्याप सत्तास्थापनेचा पेच मात्र कायम आहे. सत्तेत अपेक्षित स्थान मिळणार नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच ‘एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद तरी द्यायला पाहिजे,’ असे म्हणत गुलाबराव पाटलांनी एकप्रकारे शिंदेंच्या नाराजीची पुष्टी दिली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी बोचरी टीका केली आहे. एकनाथ शिंदे मंत्रीपदासाठी सगळे फंडे वापरत आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारेंनी यांनी एक्सवर पोस्ट लिहत गुलाबराव पाटलांना लक्ष्य केले आणि महायुतीतील सत्तास्थापनेच्या पेचप्रसंगावरही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, सत्तास्थापनेाठी महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. एकनाथ शिंदे हे सध्या साम, दाम, दंड, भेद आणि भावनिक असे सगळे फंडे वापरत आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणतात की संजय राऊत आगीत तेल टाकत आहेत. याचाच दुसरा अर्थ, ‘रान पेटलंय’ हे गुलाबराव पाटील यांनी मान्य करतात.
‘महायुतीत स्ट्राईक रेटनुसार आम्ही दोन नंबरवर,’ शिवसेनेच्या तीन नंबरची आठवण करुन देत भुजबळांची मोठी मागणी
यासोबतच सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांना सावध देखील केले आहे. ‘गुलाबराव ५ तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा. नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच EDचा दोरखंड सुद्धा आवळू शकतात.’ असे अंधारे म्हणाल्या.

एकनाथ शिंदे यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद जाणार आहे हे जवळपास ठरलं आहे. आता गृहखात्यावरूनही महायुतीत कलगीतुरा सुरु असल्याचे समजते. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या रुसण्यामागे दिलीतील महाशक्ती असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर आझाद मैदानावरील पाहणी करायला फक्त भाजपचे लोक गेले, यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा होती. यावरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.