Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
निवडणुकीच्या निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाची घटना घडली. गिरणा पंपींग प्लांटवरील जुनी पाईपलाईन जीसीबी द्वारे खोदून चोरली जात होती. मनपा अभियंत्याच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात राजकीय नेताचाही हात असण्याची शक्यता आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जळगाव शहराला कधी काळी पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा पंपींग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे चारी खोदून चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनपा अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून काही मोठे चेहरे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जळगाव शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२ रोजी ते उमाळे येथील फिल्टर प्लॉन्टचे कामकाज पाहण्यासाठी गेलो असता त्यांना कॉण्ट्रक्टर सुमीत सोनवणे यांनी फोन केला. गिरणा पंपींग जवळ आर्यन पार्कच्या समोर असलेली जुनी पाण्याची लोखंडी पाईप लाईन कोणीतरी जेसीबी वाहनाच्या साह्याय्याने चारी खोदुन काढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बोरोले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.
जेसीबीच्या साहाय्याने चोरी करताना पकडले
सायंकाळी ६.३० वाजेचे सुमारास योगेश बोरोले हे शामकांत भांडारकर (इंजीनिअर), विशाल सुर्वे, दिपक चौधरी यांच्यासह त्याठिकाणी पोहचले. त्यावेळी एक पिवळ्या रंगाचे जेसीबीवरील दोन इसम हे जेसीबीच्या साह्याय्याने जुन्या पाईप लाईन मधील बीडचे पाईप काढताना मिळुन आले. जेसीबी चालक नरेंद्र निवृत्ती पाणगडे, व रवण चव्हाण अशी त्यांची नावे समोर आली.
एकाने काढला पळ, तिघांची सांगितली नावे
अधिकाऱ्यांनी दोघांना जेसीबीच्या खाली उतरण्यास सांगितले असता रवण चव्हाण हा लक्ष विचलीत करुन तेथून पळून गेला. नरेंद्र पाणगडे याचेकडे चौकशी करीत असताना अक्षय अग्रवाल हा देखील त्या ठिकाणी उपस्थित झाला. नरेंद्र पाणगडे यास सदरची पाईप लाईन कोणी खोदावयास सांगितली? अशी विचारणा केली असता त्याने अक्षय अग्रवाल, भावेश पाटील व अमिन राठोड यांचे सांगण्यावरुन खोदली असुन सदर जेसीबी आणण्याबाबत अक्षय अग्रवाल याने मला सांगितल्याने मी सदर जेसीबी आणुन त्याव्दारे पाईप लाईन खोदुन त्यातुन जुने पाईप काढत असल्याचे सांगितले.
जेसीबी, पाईप जप्त, सहा जणांविरुद्ध गुन्हा
अधिकाऱ्यांनी अक्षय अग्रवाल याचेकडे चौकशी केली असता त्यानेच सदर जेसीबी वाहन सदर ठिकाणी पाठविल्याचे सांगितले. यावरून महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता योगेश बोरुडे यांच्या फिर्यादीवरून मेहरून परिसरातील सुनील सुपडू महाजन, अक्षय अग्रवाल, नरेंद्र पानगडे, रवण चव्हाण, भावेश पाटील, अमीन राठोड आणि या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र तो नेता कोण हे लवकरच समोर येणार आहे
यासंदर्भात पालिकेच्या उपभियंतांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. तर एक आरोपी अद्याप फरार असून त्या फरार आरोपीचा तपास पोलीस घेत असून लवकरच त्या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या जाणार असल्याचं जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी सांगितलं.