Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विद्यार्थी गाढ झोपेत, चालकाचा ताबा सुटला, सहलीला गेलेल्या बसचा भीषण अपघात; अन्…

4

sindhudurg Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील नांदगाव-ओटव फाटा येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे ते सिंधुदुर्ग जाणारी विद्यार्थ्यांची एसटी बस संरक्षक कठड्याला धडकली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला परंतु बसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे. सिंधुदुर्गातील नांदगाव-ओटव फाटा येथे अपघात झाला आहे. एसटी बस ही पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांची सहल घेऊन निघाली होती. मात्र बस वरील ताबा सुटल्याने एसटी बस ही संरक्षण कटार्‍याला आढळून भीषण अपघात घडला आहे.हा अपघात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरील संरक्षक कठड्याला आदळली. सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. या अपघाताची माहिती करता स्थानिक आणि घटनास्थळी धाव घेतली असून या ठिकाणी नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्यासह भुपेश मोरजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर, दिक्षा मोरजकर आदींनी तातडीने मदतकार्य केले. तसेच त्यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांना घेऊन ही बस सिंधुदुर्गातील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी निघाली होती ही बस विद्यार्थ्यांना घेऊन मालवणच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती स्थानिकांकडून समोर येत आहे.मध्यरात्री दोनच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नांदगाव-ओटव बॉक्सवेलवरील संरक्षक कठड्याला आदळली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. सर्व विद्यार्थी गाढ झोपेत होते. यातील काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाला मध्यरात्री अचानक झोप लागल्यामुळे त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचं म्हटलं जात आहे.तसेच वेगावर नियंत्रण असल्यामुळे फार मोठा अपघात घडला नाही.

एसटी बस ही संरक्षण कठड्याला धडकताच मोठा आवाज आला.त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलीय. एसटीचा अपघात घडल्यामुळे विद्यार्थीही घाबरून गेले होते त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केला.तसेच तातडीने १०८ रूग्णवाहिका मागवून जखमींना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. मात्र या घडलेल्या अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आहे हवालदार चंद्रकांत झोरे, श्री माने, तसेच महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव हे घटनास्थळी दाखल झाले होते.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.