Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तटकरे, राणे, कदम; कोकणातील जनरेशन नेक्स्टचे मंत्रिमंडळात ‘कदम’, जुने-जाणते साफ एकदम?

6

कोकणातून दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, आदिती तटकरे, नितेश राणे, योगेश कदम ही महायुतीतील नावं मंत्रिमंडळासाठी चर्चेत आहेत.

Lipi

प्रसाद रानडे, रत्नागिरी : निवडणुकीच्या निकालानंतर अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ उद्या स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा शपथ घेणार असल्याचे निश्चित मानले जाते. हा भव्य शपथविधी सोहळा मुंबईत आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. यासाठी कोकणातूनही काही मान्यवर मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये जगद्गुरु स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांनाही विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र या नव्या सरकारमध्ये आता कोकणातून कोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. कोकणातून दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, आदिती तटकरे, नितेश राणे, योगेश कदम ही महायुतीतील नावं मंत्रिमंडळासाठी चर्चेत आहेत.

शिवसेनेकडून मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. मात्र कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत व रायगडमधून शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भरत गोगावले, अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे यांच्या सुकन्या आदिती तटकरे ही तीन नावं निश्चित मानली जातात. मात्र या मंत्रिमंडळात तळ कोकणातील सावंतवाडी मतदारसंघाचे दीपक केसरकर यांना पुन्हा संधी मिळणार किंवा कसे हे पहावे लागणार आहे. आमदार भरत गोगावले यांची संधी महायुतीच्या पहिल्या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये हुकली होती त्यामुळे नाराज असलेल्या गोगावले यांना संधी देण्यासाठी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना प्राधान्याने विचार करावा लागणार आहे.
Balya Mama Mhatre : माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच

कदम यांना एकनाथ शिंदे यांचा शब्द

मंत्रिमंडळात युवा वर्गाला स्थान देण्यासाठीही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विचार करवा लागणार आहे. यामध्ये अदिती तटकरे व उदय सामंत ही दोन नावं निश्चित झाली आहेत. याचवेळी आणखी एका नव्या युवा नेत्याला संधी मिळू शकते. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र दापोलीचे आमदार योगेश कदम हे कोकणातील सगळ्यात युवा आमदार म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोलीतील जाहीर सभेत ‘तुम्ही योगेशला आमदार करा मी नामदार करतो’ असा शब्द जाहीर सभेत दिला होता. आता या शब्दाची वचनपूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करतात का याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Ministers : तटकरे, राणे, कदम; कोकणातील जनरेशन नेक्स्टचे मंत्रिमंडळात ‘कदम’, जुने-जाणते साफ एकदम?

Shiv Sena : मुंबईतच थांबा, शिवेसेनेच्या सात आमदारांना शिंदेंच्या सूचना, तीन मंत्र्यांचे पत्ते कट
भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात भाजपकडून स्थान दिले जाऊ शकते. त्यांची ही तिसरी टर्म आहे व हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. नितेश राणे यांनी राज्यभर सभा गाजवल्या आहेत. मुंबईतही त्यांनी अनेक सभा घेतल्या आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्यासारख्या युवा नेत्याला महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान हे निश्चित मानले जाते. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीत शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, की त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी देऊन मंत्रिमंडळातून नारळ देणार अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे कोकणातून कोणाकोणाला संधी मिळते याकडे अवघ्या कोकणाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.