Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
6th December 2024 Holiday : ६ डिसेंबरला मुंबईत सरकारी ऑफिस, शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
6th december 2024 holiday on mahaparinirvan din : मुंबईत ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळा, कॉलेज तसंच सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
४ ते ७ डिसेंबरपर्यंत विशेष बस सुविधा
डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर, मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी जमतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी ४ ते ७ डिसेंबरपर्यंत विशेष बस प्रवासाची योजना करण्यात आली आहे. त्याशिवाय दादर रेल्वे स्थानकापासून ते चैत्यभूमीपर्यंत १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर बस सेवा देण्यात येणार आहे.
१२ विशेष लोकल धावणार
तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेची खास सुविधा करण्यात आली आहे. गुरुवारी ५ डिसेंबर मध्यरात्रीपासून परेल – कल्याण आणि कुर्ला – पनवेल स्थानकांदरम्यान १२ विशेष लोकल ट्रेन चालवल्या जाणाऱ्या आहेत. या सर्व अतिरिक्त ट्रेन सर्व स्थानकांत थांबतील. ५ आणि ६ डिसेंबर या दोन दिवशी अतिरिक्त ट्रेन धावणार आहेत.
६ डिसेंबरला आंबेडकरी अनुयायांसाठी धावणार १२ विशेष लोकल, मध्य रेल्वेची व्यवस्था, जाणून घ्या Timetable
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येतात. या सर्व अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी बीएमसीसह राज्य सरकारद्वारे सर्व तयारी करण्यात आली आहे.
6th December 2024 Holiday : ६ डिसेंबरला मुंबईत सरकारी ऑफिस, शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन सहभागी झाले होते. तसंच बैठकीला राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसंच इतर उपस्थित होते.