Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Manoj Jarange Patil Commented on Devendra fadnavis CM: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार मिळणार आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी प्रथमत: देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मराठा आंदोलनाचा लढा आणखी तीव्र करणार असल्याचेही जरांगेंनी म्हटले आहे. जरांगे पाटील म्हणाले, ‘शुभेच्छा न द्यायला ते काही आमचे शत्रू नाहीत त्यामुळे त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय कोणालाच सुट्टी नाही. या महाराष्ट्रात आमची ती संस्कृती आहे, विरोध केला जातो आणि मोठ्या मनाने शुभेच्छाही दिल्या जातात. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला काहीही अडचण नाही.’
जरांगे पाटील पुढे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सामूहिक आमरण उपोषण करणार असून, मरेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. आंदोलनाची पुढची दिशाही तशीच राहणार आहे. यावरुन जरांगे पाटील नव्या सरकारसमोर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार असल्याचे दिसते.
यासोबतच जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आपली मागणी पुन्हा मजबूत केली आहे. ‘सत्ता आली बहुमताने निवडून आलात, पण मराठ्यांशिवाय सत्तेत कोणीही बसू शकत नाही. मराठे जोपर्यंत शांत राहतात तो पर्यंत शांत राहतात. अन्यथा ते कोणाच्याही बापाला घाबरत नाहीत. एकदा जर मराठा रस्त्यावर उतरला तर तुमचं काही खरं नाही, असा इशारा जरांगेंनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणे हे नव्या सरकारसाठी आव्हानात्मक ठरु शकते.