Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Hingoli News : मुलांचे शिक्षण झालं मात्र नोकरी नाही, मराठा आरक्षणदेखील नाही. हताश वडिलांनी चिठ्ठी लिहून टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मूळचे नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील मरडगा येथील दिलीप काळे हे कुटुंबीयांसह मागील अनेक वर्षांपासून आखाडा बाळापूर येथे वास्तव्यास होते. मुलांचे शिक्षण चालू असल्याने आणि मुलांनी अनेक वेळा नोकरीसाठी प्रयत्न करून देखील नोकरी मिळत नाही. त्यातच मराठा समाजाला आरक्षण नसल्याने हतबल झालेल्या पित्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या पॅन्टच्या खिशात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आत्महत्येमागचं कारण समोर आलं आहे.
मुंबईत मृतावस्थेत आढळली एअर इंडियाची पायलट, धक्कादायक बाब समोर; २५ वर्षीय तरुणीसोबत काय घडलं?
चिठ्ठीत काय लिहिलं?
“मी मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांनी शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी लागत नाही”, असं या चिठ्ठीतील मजकुरात नमूद केलं असल्याचं आढळून आलं आहे.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या दिलीप यांना दोन मुलं आहेत. एका मुलाचं अभियांत्रिकीपर्यंत शिक्षण झालं आहे, तर दुसरा मुलगा देखील पदवीधर आहे. सध्या स्पर्धा परीक्षेची तो तयारी करत असल्याची माहिती आहे. मयत दिलीप काळे हे शेतीची कामं करत होते.
Pune Crime : लिव्ह-इन पार्टनरला संपवलं, १३० किमी दूर खंडाळ्यात फेकलं; नंतर रचलेल्या बनावाने पोलिसही हैराण, पुण्यात काय घडलं?
बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सर्वांनी जेवण केलं आणि त्यानंतर त्यांचा एक मुलगा खोलीमध्ये अभ्यास करण्यासाठी बसला होता. त्यावेळी दिलीप यांनी दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन आतून दरवाजा लावून घरातील फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळानंतर दुसऱ्या मुलाने खोलीचा दरवाजा आतल्या बाजूने बंद असल्याचं दिसल्याने त्याने मागील बाजूने आतमध्ये प्रवेश केला असता दिलीप काळे यांनी आत्महत्या केली असल्याचं दिसलं. समोरील दृष्य पाहून मुलांनी आरडाओरडा केला.
पत्नी बाहेरुन आली, पतीला समोर पाहताच हंबरडा फोडला; चिठ्ठी लिहून शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल
दाराला कडी, मुलाने मागच्या दरवाजाने समोरचं दृष्य पाहिलं आणि… चिठ्ठी लिहून हताश वडिलांचं टोकाचं पाऊल
त्यानंतर आखाडा बाळापूर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. यावरून आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे आणि यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली असता मृत दिलीप यांच्या खिशात मराठा आरक्षणासंदर्भात चिठ्ठी आढळून आली आणि त्यानंतर उत्तरिय तपासणीसाठी मृतदेह आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला. अद्याप या घटनेतील गुन्हा दाखल झाला नसल्याचं आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी सांगितलं आहे.