Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

६ महिने CM राहू द्या! शिंदेंनी शहांकडे केलेली मागणी; गृहमंत्र्यांनी तीन वाक्यांत विषय संपवला

3

Amit Shah: गेल्या आठवड्यात दिल्लीत भाजप नेतृत्त्वासोबत झालेल्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी सहा महिने आपल्याला मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, अशी मागणी केली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झालेलं आहे. उद्या संध्याकाळी आझाद मैदानावर त्यांचा शपथविधी होईल. त्याआधी गेल्या आठवड्यात दिल्लीत भाजप नेतृत्त्वासोबत झालेल्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी सहा महिने आपल्याला मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, अशी मागणी केली होती. टाईम्स ऑफ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. महायुतीनं २३४ जागा जिंकल्या. त्यातील १३२ जागा भाजपला मिळाल्या आहेत. भाजपचं संख्याबळ पाहता मुख्यमंत्री त्यांचाच होणार हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे दिल्लीत शहांच्या भेटीसाठी गेलेल्या शिंदेंनी वाटाघाटीत काहीशी सावध भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा पूर्ण कार्यकाळ देता येत नसेल तर किमान सहा महिने मुख्यमंत्रिपदी राहू द्या, अशी मागणी शिंदेंनी शहांकडे केली होती. सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्रिपद आपल्याकडे राहावं यासाठी शिंदे आग्रही होते. एका ज्येष्ठ नेत्यानं याबद्दलची माहिती टाईम्स ऑफ इंडियाला दिली.
Eknath Shinde: त्यांना सकाळी, संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव! शिंदेंचा टोला; दादा म्हणाले, आमचं तेव्हा…
‘सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याची पद्धत नाही. तो वाईट निर्णय ठरले. त्याचे प्रशासनावर नकारात्मक परिणाम होतील,’ असं उत्तर शहांनी शिंदेंना दिलं. शहा आणि शिंदे यांची बैठक २८ नोव्हेंबरला झाली. बैठक होण्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या ठाण्यातील घरी पत्रकार परिषद घेतली. सत्ता स्थापनेसाठी भाजप नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला आणि माझ्या पक्षाला मान्य असेल, असं शिंदे त्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

दिल्लीत झालेल्या बैठकीला शहा, शिंदे यांच्यासोबत भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. वरिष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत शिंदेंनी भाजप नेतृत्त्वानं त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली.
Ajit Pawar: तुम्ही दादांसोबत DCMपदाची शपथ घेणार का? शिंदेंना प्रश्न, दादांंकडून उत्तर; एकच हास्यकल्लोळ
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यास तुम्हालाच मुख्यमंत्री करण्यात येईल, असा शब्द तुम्ही मला दिला होता, याचं स्मरण शिंदेंनी भाजप नेतृत्त्वाला करुन दिलं. पुन्हा मुख्यमंत्री करण्याची विनंती शिंदेंनी केली. पण भाजपनं ती फेटाळून लावली. भाजप आता बहुमताच्या अगदी जवळ आहे. या परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री न झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असं शिंदेंना सांगण्यात आलं.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.