Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pune Mulshi Wrestler Vikram Parkhi passes Away: पैलवान विक्रम पारखी (वय ३०) असं मृत झालेल्या पैलवानाचं नाव आहे. त्यामुळे कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यांना पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हायलाइट्स:
- जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका
- पुण्याच्या मातीतला एक पैलवान हरपला
- पैलवान विक्रम पारखी यांचं निधन

विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी किताब पटकावून मुळशीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधित्व करत पदके मिळवली होती. तसेच अनेक कुस्ती मैदाने गाजवत मानाच्या गदा मिळवल्या होत्या. त्यांच्या निधनाने माण गावावर तसेच पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र राज्यातील पैलवान, वस्ताद कुस्तीशौकीन हळहळ व्यक्त करत आहे. माजी सैनिक शिवाजीराव पारखी यांचे ते चिरंजीव तर युवा नेते बाबासाहेब पारखी यांचे बंधू होते. मुळशी तालुका हा पैलवानांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, एका पैलवानाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. विक्रम हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबं आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
गल्लीतली मैत्री, मोबाईलवर चॅटिंग; ‘त्या’ गोष्टीसाठी नकार अन् तरूणीनं संपवलं जीवन
दरम्यान, पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येरवडा परिसरामध्ये अल्पवयीन मुलीने आपलं जीवन संपवलं आहे. या टोकाचा निर्णय घेण्यामागचं कारण अगदी शुल्लक आहे. मित्राने भेटण्यास आणि बोलण्यास नकार दिल्याच्या तष्णीतून अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. येरवडा पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यावर मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.