Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra CM Devendra Fadnavis: फडणवीस आज, गुरुवारी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा होईल.
हायलाइट्स:
- पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, अनेक मुख्यमंत्री उपस्थित राहणार
- महायुतीच्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर राज्यपालांचे फडणवीस यांना निमंत्रण
- भाजपसह महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये उत्साह; आज शक्तिप्रदर्शनाची तयारी

भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी फडणवीस यांची विनंती मान्य करून त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. या वेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या पक्षांच्या वतीने फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, अशी शिफारस करणारे पत्र राज्यपालांना सादर केले. त्यामुळे फडणवीस यांना भाजपचे १३२, शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आणि इतर मित्र पक्ष असे एकूण २३७ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. आज, गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानात फडणवीस राज्याचे २१वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने भाजप कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

निवडणुकीत महायुतीला मोठा जनादेश मिळाल्याने आता जबाबदारीही वाढली आहे. चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, तर चार गोष्टी मनाविरुद्धही होतील. मात्र, आपण एकत्रित काम करून आपली शक्ती दाखवून देऊ. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमचे सरकार कटिबद्ध असेल. – देवेंद्र फडणवीस
अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. आज मला त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून शिफारस करताना आनंद होत आहे. गेल्या अडीच वर्षांत आम्ही तिघांनी टीम म्हणून काम केले. आताही तसेच काम करू. – एकनाथ शिंदे
पाच वर्षांपूर्वी आम्ही (फडणवीस यांच्यासह) शपथ घेतली; पण ते राहून गेले. आता मात्र सलग पाच वर्षे एकत्र काम करणार आहोत. निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करतानाच देशातील आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकिक कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहू. -अजित पवारतुम्हीही हाच एटीएम पिन ठेवलात का? सावधान, पाकीटमारांची नवी शक्कल, झटक्यात बॅंक खातं होईल रिकामं
मंत्रिमंडळात संधी कोणाला ?
पुणे : पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान द्यायचे, याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या व्यतिरिक्त पुण्यातून किती जणांना स्थान मिळणार, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत की नाहीत, याबाबत रात्री उशिरापर्यंत स्पष्टता नव्हती. आज, गुरुवारी होणाऱ्या शपथविधीच्या कार्यक्रमात फडणवीस, शिंदे आणि पवार या तिघांनाच शपथ दिली जाईल, अशी चर्चा आहे. दरम्यान, भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री अशा दहा जणांना तरी शपथ द्यावी, अशीही मागणी आमदारांकडून जोर धरत असल्याची रात्री उशिरापर्यंत चर्चा झडत होती.लाडक्या बहिणींना आस २१०० रुपयांची, काही अर्ज अद्याप प्रलंबित, कधी मिळणार वाढीव हप्ता?
पुण्यातून चंद्रकांत पाटील यांचा ‘हेविवेट’ मंत्रिपदावर दावा आहे. चौथ्यांदा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ यांचे नावही मंत्रिपदाच्या चर्चेत आहे. भाजपचे महेश लांडगे, सुनील कांबळे, अमित गोरखे, राहुल कुल इच्छुक आहेत. ‘राष्ट्रवादी’ मधून दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपद नाकारल्याची चर्चा आहे. वरिष्ठ नेत्यांकडून त्यांनी मंत्रिपद स्वीकारावे, अशी सूचना करण्यात आल्याचे समजते. याशिवाय दत्ता भरणे, सुनील शेळके, अण्णा बनसोडे यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील एकमवे आमदार माजी मंत्री विजय शिवतारे हेदेखील इच्छुक आहेत.