Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र टाइम्स | Updated: 5 Dec 2024, 7:00 am
Mhada Home Lottery Winner: म्हाडाने ऑक्टोबरमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांतील २,३२७ घरांसाठी सोडत काढली होती. त्यासाठी १,३४,३५० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आणि यातील १,१३,८११ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून सोडतीमध्ये भाग घेतला.
हायलाइट्स:
- म्हाडाच्या सोडत विजेत्यांना आणखी चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा
- इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याविना सोडतीमध्ये घरांचा समावेश केला जात नाही
- अंतर्गत कामे अजूनही बाकी

अंतर्गत कामे अजूनही बाकी
म्हाडाची सोडत वाजतगाजत यशस्वी झाली असली तरीही इतक्या घरांचा ताबा प्रत्यक्षात कधी मिळणार, असा प्रश्न विजेत्या अर्जदारांकडून केला जात आहे. म्हाडाच्या सोडतीतील घरांची अंतर्गत कामे पूर्ण होण्यास चार ते सहा महिने लागतील, असे सांगण्यात येते. ती तरी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा या विजेत्या अर्जदारांनी व्यक्त केली आहे.