Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: फॅशन स्ट्रीटच्या बाजूला एक मोठा मंच उभारण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटसमोरील फाटकातून महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशाची सोय करण्यात आली आहे.
हायलाइट्स:
- तांबड्या मातीला भगवा ‘शेला’
- शपथविधीसाठी आझाद मैदान सजले
- पोलिस बंदोबस्तात आझाद मैदान
फॅशन स्ट्रीटच्या बाजूला एक मोठा मंच उभारण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटसमोरील फाटकातून महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. पुद्दुचेरी येथे आलेल्या चक्रीवादळमुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचा विचार करत संपूर्ण मंडप आच्छादित करण्यात आला आहे. या मंडपाचे छत आतून भगव्या रंगाच्या कपड्याने सजवले आहे. त्याशिवाय खाली पांढऱ्या-हिरव्या रंगाचे कापडही घातले आहे.फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?
आंदोलक मैदानाबाहेर
आझाद मैदानातील एक कोपरा आंदोलकांसाठी राखून ठेवलेला आहे, मात्र गुरुवारी शपथविधी होईपर्यंत त्या कोपऱ्यात एकही आंदोलक दिसणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी आंदोलन होते, ती जागा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याशिवाय जिथे आंदोलक बसतात, त्या ठिकाणी पोलिस पथाऱ्या पसरून बसल्याचेही चित्र होते.
आझाद मैदानात चोहूबाजूंनी कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. शपथविधीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी महापालिकेसमोरील मार्ग आणि इतर मार्ग उपलब्ध असतील. मात्र, बुधवारी या सर्व मार्गांवर, आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर पोलिस होते. मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात ड्युटी लावल्याचे काही पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या श्वान पथकातील स्फोटके शोधणारे दोन श्वानही या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. काही पोलिस गुरुवारच्या मुख्य कार्यक्रमाआधी आराम करत होते. वरिष्ठ अधिकारी काही पथकांना सूचना देत गुरुवारच्या कार्यक्रमाची रूपरेषा, सुरक्षेची व्यवस्था आदींबाबत सांगत होते.